• Mon. Nov 3rd, 2025

अधिस्विकृती धारक पत्रकारांना रेल्वे प्रवासाची 50 टक्के सवलत पुन्हा सुरु करावी

ByMirror

Sep 10, 2023

मराठी पत्रकार परिषदेची मागणी

रेल्वेचे मुंबई सेंट्रल झोन सदस्य मार्फत रेल्वेमंत्री यांना निवेदन

अहमदनगर (प्रतिनिधी)- अधिस्विकृती पत्रिका धारक पत्रकारांना बंद करण्यात आलेली रेल्वे प्रवासाची सवलत पुन्हा सुरु करण्याची मागणी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन रेल्वेच्या मुंबई सेंट्रल झोनचे सदस्य सुदर्शन डुंगरवाल यांच्या मार्फत रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांना देखील पाठविण्यात आले. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सरचिटणीस मन्सूर शेख, राज्य प्रसिद्धी प्रमुख संदीप कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक महेश देशपांडे, समन्वयक बंडू पवार आदी उपस्थित होते.


भारतीय रेल्वे विभागाकडून पत्रकारांना रेल्वे प्रवासात तिकिटामध्ये 50 टक्के सवलत दिली जात होती. देशभरातील राज्य शासनाने अधिस्विकृती पत्रिका दिलेले पत्रकार या योजनेसाठी पात्र होते. प्रवासात सवलत असल्याने वार्ता संकलनासाठी, विविध राजकीय कार्यक्रमासाठी जाण्यासाठी सवलतीचा मोठा फायदा पत्रकारांना होत होता. राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांची प्रसिद्धी देण्यासाठी, विविध योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हे सोयीचे होते, असे निवेदनात म्हंटले आहे.


सन 2020 पासून रेल्वे विभागाने पत्रकारांची ही सवलत बंद केली आहे. त्यामुळे देशभरातील पत्रकारांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. प्रवासात सवलत नसल्याने अनेक पत्रकार प्रवास करत नाहीत. परिणामी सरकारी योजना, शासकीय कार्यक्रमाला जाण्यास अडचणी येत आहेत. सर्व बाबींचा विचार करून देशभरातील राज्य शासनाने अधिस्विकृती पत्रिका दिलेल्या पत्रकारांना पूर्वीप्रमाणे रेल्वे प्रवासात सवलत देण्याची मागणी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *