तिसऱ्यांदा बिनविरोध संचालकपदी निवड
कमी वयात अनेक मोठी पदे भुषविणारे मारुती पवार भिंगारकरांचा अभिमान -सुभाष होडगे
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- महेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकपदी मारुती कुंडलिकराव पवार यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल भिंगार ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे सुभाष होडगे, रामलिंग मेनसे, मुरलीधर बरबडे, प्रकाश तरवडे, राजेंद्र धर्माधिकारी, अशोक नागपुरे, अनंद सदनापूर, कैलास बिडवे, भागचंद राऊत, अशोक गलांडे आदी उपस्थित होते.
सुभाष होडगे म्हणाले की, कमी वयात अनेक मोठी पदे भुषविणारे मारुती पवार भिंगारकरांचा अभिमान आहे. राजकीय, सामाजिक व सहकार क्षेत्रात त्यांचे सुरु असलेले कार्य कौतुकास्पद आहे. तिनदा व्हाईस चेअरमन व बिनविरोध होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे. ज्येष्ठ नागरिक संघासाठी देखील त्यांचे योगदान मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना मारुती पवार यांनी ज्येष्ठांनी पाठीवरती दिलेली थाप काम करण्यास ऊर्जा देणारी आहे. त्यांच्या आशिर्वाद व मार्गदर्शनाने यश मिळत असून, सामाजिक भावनेने सर्वच क्षेत्रात कार्य सुरु राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.