संचालकपदी तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल केले कामाचे कौतुक
अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील महेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकपदी मारुती कुंडलिकराव पवार यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल आमदार संग्राम जगताप यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी प्रा. माणिक विधाते, अभिजीत खोसे, सुरेश बनसोडे, मतीन ठाकरे, दीपक लिपाणे, सागर चवंडके, संपत बेरड, विलास तोडमल, दिनेश लंगोटे, संदेश झोडगे आदी उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, राष्ट्रवादीचे पदाधिकारी असलेले मारुती पवार यांचे राजकीय व सामाजिक क्षेत्रासह सहकार क्षेत्रातही भरीव योगदान देत आहे. 2011 पासून संचालक पदावर असलेले पवार यांच्या संस्थेतील उत्कृष्ट कार्यामुळे त्यांना तिनदा व्हाईस चेअरमन पदाची संधी व तिसऱ्यांदा बिनविरोध होण्याचा मान मिळाला आहे. त्यांचे सुरु असलेले कार्य अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
मारुती पवार यांनी सत्काराला उत्तर देताना राजकीय, सामाजिक व सहकार क्षेत्रात काम करताना वेळोवेळी आमदार जगताप यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. त्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला दाखवलेल्या विश्वासामुळे चांगल्या प्रकारे काम करता आहे. पक्षात देखील त्यांनी महत्त्वाची जबाबदारी देऊन प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान वाढविला असल्याचे त्यांनी सांगितले.