पवार यांची झालेली नियुक्ती बँक व भिंगार शहराच्या दृष्टीने अभिमानास्पद -अनिलराव झोडगे
अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार अर्बन बँकेच्या वतीने बँकेचे सभासद तथा सामाजिक कार्यकर्ते मारुती पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. बँकेचे चेअरमन अनिलराव झोडगे व व्हाईस चेअरमन किसनराव चौधरी यांनी पवार यांचा सत्कार केला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रमुख पाहुणे कॅन्टोन्मेंट बोर्डचे उपाध्यक्ष वसंत राठोड, महेश झोडगे, बँकेचे संचालक एकनाथराव जाधव, विजय भंडारी, नाथाजी राऊत, अमोल धाडगे, राजेंद्र झोडगे, सरपंच जयराम बेरड, दत्तूशेठ आवारे, नामदेव लंगोटे आदींसह संचालक व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

अनिलराव झोडगे म्हणाले की, भिंगार शहर राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे ठरत आहे. राजकारणातील अनेक महत्त्वाची पदे भिंगारकर सक्षमपणे पेलवित आहे. बँकेचे सभासद असलेले मारुती पवार यांच्याकडे राष्ट्रवादीच्या सोशल मीडिया विभागाची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. आमदार संग्राम जगताप कार्यकर्त्यांचे कौशल्य व गुण ओळखून त्यांना विविध पदाच्या माध्यमातून काम करण्याची संधी उपलब्ध करुन देत आहे. पवार यांची झालेली नियुक्ती बँक व भिंगार शहराच्या दृष्टीने अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. उपस्थितांनी देखील पवार यांच्या नियुक्तीचे स्वागत करुन त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना मारुती पवार म्हणाले की, राष्ट्रवादी पक्षात कार्य करताना भिंगार शहराच्या विकासात्मक दृष्टीने देखील कार्य केले जाणार आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून भिंगारचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.