सहकार क्षेत्रात मारुती पवार यांचे कार्य प्रेरणादायी -महेश झोडगे
अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील महेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकपदी मारुती कुंडलिकराव पवार यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल भिंगार अर्बन बँकेचे संचालक महेश झोडगे मित्र परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच नवनिर्वाचित संचालक किरण पतके व सुदाम गांधले यांचा देखील सत्कार पार पडला. यावेळी महेश झोडगे, बाळासाहेब टागडकर, रवी फल्ले, सचिन जाधव, राकेश ताठे, अभिजीत झोडगे, योगेश धाडगे, अक्षय बनसोडे, अर्जुन पोटे, ज्ञानेश्वर धोत्रे, बबलू नंदे, श्याम घुले, मिलिंद शिंदे, गणेश बेरड आदी उपस्थित होते.
महेश झोडगे म्हणाले की, महेश नागरी सहकारी पतसंस्थेत 2011 पासून संचालक पदावर व तिनदा व्हाईस चेअरमन पदाचे कामकाज पाहिलेले मारुती पवार यांचे कार्य प्रेरणादायी आहे. सहकार क्षेत्राचा असलेला त्यांचा अभ्यास संस्थेच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. सत्काराला उत्तर देताना मारुती पवार यांनी संस्थेत ज्येष्ठ संचालकांच्या मार्गदर्शनाखाली उत्तमपणे काम करण्याची संधी मिळाली. संस्थेत टाकलेली जबाबदारी सक्षमपणे पेलवल्याचे त्यांनी सांगितले.