प्राचार्य शिरीष टेकाडे यांच्या सेवापूर्तीनिमित्त संस्थेच्या वतीने गौरव
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- टेकाडे सरांच्या मार्गदर्शनाने अनेक यशस्वी पिढ्या घडल्या. त्यांनी घडवलेली अनेक मुले उच्च पदावर कार्यरत आहे. विद्यार्थ्यांना त्यांनी मौल्यवान ज्ञान आणि जीवनाचे धडे देताना जिल्हा मराठा संस्थेचा नावलौकिक वाढवला असल्याचे प्रतिपादन जिल्हा मराठा संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे यांनी केले.
देहरे (ता. नगर) येथील नवभारत माध्यमिक व उच्च माध्यमिक उद्यालयाचे प्राचार्य शिरीष टेकाडे यांच्या सेवापुर्ती गौरव समारंभा प्रसंगी अध्यक्षीय भाषणात दरे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. विवेक भापकर, खजिनदार ॲड. दिपलक्ष्मी म्हसे, विश्वस्त जयंत वाघ, कार्यकारिणी सदस्य दिपकराव दरे, माजी जि.प. सदस्य संदेश कार्ले हे होते.
याप्रसंगी प्राचार्य शिरीष टेकाडे व सौ.उज्वला शिरीष टेकाडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सन्मान करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष डॉ. भापकर म्हणाले, गेली 32 वर्ष टेकाडे सरांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन घडले. त्यांनी आपल्या कारकिर्दीत देहरे शाळेची खूप प्रगती केली. उत्कृष्ट आणि मेहनती मार्गदर्शक म्हणून त्यांनी वेगळा ठसा उमटवीला असल्याचे स्पष्ट केले.
खजिनदार ॲड. दिपलक्ष्मी म्हसे म्हणाल्या की, मुख्यध्यापक हे संस्थेच्या यशाचे पिलर असून जिल्हा मराठा संस्थेत टेकाडे सरांसारखे अनेक मौल्यवान लोकं आहेत. शाळेच्या भरभराटीसाठी प्रयत्न करत असताना त्यांना पत्नीची चांगली साथ लाभल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यकारिणी सदस्य दीपक दरे म्हणाले, देहरे येथील इंग्लिश मीडियम स्कूल तसेच ज्युनिअर कॉलेजचे रोपटे वाढविण्यात टेकाडे सरांचे मोलाचे योगदान आहे. विद्यार्थ्यांना त्यांनी फक्त अभ्यास शिकवला नाही तर जीवन जगण्याची कला शिकविली. माध्यमिक शिक्षक सोसायटीचे चेअरमन आप्पासाहेब शिंदे यांनी नवभारत विद्यालयाचे भौतिक वैभव निर्माण करण्याचे काम टेकाडे सरांनी केल्याचे सांगितले.
सत्काराला उत्तर देताना प्राचार्य टेकाडे म्हणाले की, संस्थेमुळे टेकाडे परिवार घडला, त्यामुळे संस्थेचे आपण कधीही उतराई करु शकत नाही. वडिलांनी दिलेल्या संस्काराच्या बळावर आयुष्यभर काम केले, ते करत असताना पत्नीने मोलाची साथ दिल्याचे सांगितले. प्रास्ताविकातून पर्यवेक्षक अंकुश बर्डे यांनी प्राचार्य शिरीष टेकाडे यांच्या जीवन पटाचा लेखाजोखा मांडला. या कार्यक्रमासाठी संस्था माजी निरीक्षक उत्तमराव राजळे, हरिभाऊ जावळे, तात्यासाहेब भापकर पांडुरंग गोरे, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे, महेंद्र हिंगे, सुनील दानवे, विजयराव पठारे, सौ. वैशाली दारकुंडे, कल्याण ठोंबरे, बालाजी गायकवाड, शिवाजीराव लवांडे, सोसायटीचे सचिव स्वप्नील इथापे, प्राथमिक शिक्षकांचे नेते रावसाहेब रोहकले गुरुजी, प्राचार्य दत्ता पाटील नारळे, राजेंद्र लांडे, अर्जुन भुजबळ, बाळासाहेब खिलारी, आदम शेख, बळीराम सातपुते, सुधाकर सुंबे, सुधाकर सुंबे, बाळासाहेब लोटके, संपत लोटके, गुलाबराव कार्ले, दिलीप गाडे, बाळासाहेब मुळे, व्ही.डी. काळे, संजय लांडगे, यासह जिल्हा शिक्षक संघटना, क्रीडा महासंघाचे अध्यक्ष नंदकुमार शितोळे व पदाधिकारी, विविध शाळांचे प्राचार्य, माजी, सहशिक्षक विद्यार्थी, देहरे गावचे आजी माजी सरपंच, उपसरपंच सदस्य, सेवासोसायटी अध्यक्ष, उपाध्यक्ष, आजी-माजी सैनिक संघटना, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक लष्कर व रोहिणी पवार यांनी केले. आभार माधवी कटारे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नवभारत विद्यालय देहरे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, यांनी परिश्रम घेतले.
