आढावा बैठकीत समाजतील प्रश्न व संघटनेच्या दिशात्मक वाटचालीवर चर्चा
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात माळी महासंघाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत समाजतील प्रश्न व संघटनेच्या दिशात्मक वाटचालीवर चर्चा करण्यात आली.

नंदनवन लॉन येथे झालेल्या बैठकीत माळी महासंघाचे राष्ट्रीय अधक्ष आविनाश ठाकरे, प्रदेशाध्यक्ष अरूण तिखे व प्रदेश उपाध्यक्ष राम पानमळकर यांच्या मार्गदर्शनानूसार पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. या बैठकीसाठी जिल्हाध्यक्ष गणेश बनकर, महिला जिल्हाध्यक्षा प्रयगाताई लोंढे, नंदकुमार नेमाने, नितीन डागवाले, संदीप दळवी, आकाश महाराज फुले, संदीप दरवडे, सुभाष गोंधळे, तुषार फुलारी, राहुल साबळे, विवेक फुलसौंदर, यश भांबरकर, राजेंद्र बोरुडे, गणेश धाडगे, मनोज फुलसौंदर, योगेश गाडीलकर, राजेंद्र रासकर, भूषण भुजबळ, सावता धाडगे, उमेश साखरे, विकास रासकर, जयश्री व्यवहारे, छायाताई चिपाडे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत महिला जिल्हा उपाध्यक्षपदी जयश्रीताई व्यवहारे, महिला शहराध्यक्षपदी छायाताई चिपाडे, नगर तालुका महिला अध्यक्षपदी भारती बनकर, सांस्कृतिक आघाडी पारनेर तालुका अध्यक्षपदी विकास रासकर, कर्मचारी आघाडीच्या जिल्हा महासचिवपदी राहुल साबळे यांची नियुक्ती करण्यात आली. नुतन पदाधिकाऱ्यांना प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रदेश उपाध्यक्ष राम पानमळकर यांनी माळी महासंघाच्या माध्यमातून जिल्हा पातळीवर उत्तमपणे संघटन सुरु आहे. समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी संघटना कटिबध्द असून, नुतन पदाधिकारी समाजबांधवांच्या न्याय, हक्काच्या प्रश्नावर कार्य करणार असल्याचे स्पष्ट केले. जिल्हाध्यक्ष गणेश बनकर यांनी मिळालेल्या पदाच्या उपयोग समाजाच्या सर्वांगीन विकासासाठी करावा. संघटनेच्या माध्यमातून तळागाळापर्यंतच्या समाजातील दुर्बल घटकांना प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने योगदान देण्याचे त्यांनी आवाहन केले. सर्व सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे राज्य व जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. आभार राहुल साबळे यांनी मानले.
