आ. जगताप यांनी शहरातील मुलभूत प्रश्न सोडवून पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम केले -देविदास हिरे
नगर (प्रतिनिधी)- नगर शहर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांना खानदेश मैत्री प्रतिष्ठानच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. शहर विकासासाठी योगदान देऊन नागरिकांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करुन उद्योग व व्यवसायाला चालना दिल्याने आ. जगताप यांना यांना पाठिंब्याचे पत्र देण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष देविदास हिरे, उद्योजक हेमचंद इंगळे, सामाजिक नेते संजय खामकर, अनिल निकम, दिनेश देवरे, विनोद कांबळे आदी उपस्थित होते.
देविदास हिरे म्हणाले की, खानदेश मैत्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोठा समाज वर्ग जोडला गेलेला आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातून आ. जगताप यांच्या विकास कामांना पाठिंबा दर्शविण्यात आलेला आहे. आ. जगताप यांनी शहरातील मुलभूत प्रश्न सोडवून पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम केले. औद्योगिक व व्यवसाय क्षेत्राला चालना देऊन शहराचा विकास साधण्यास चालना दिली.
शहराच्या विकास कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन विविध कामे त्यांनी मार्गी लावली. त्यामुळे शहराची विकासात्मक वाटचाल होत आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक व शालेय विद्यार्थ्यांसाठी अनेक सोयी-सुविधा त्यांनी निर्माण केल्या. विकासात्मक शहराचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी त्यांना पुन्हा निवडून देण्याचे त्यांनी आवाहन केले.