रक्तदान ही गरजू रुग्णांना जीवदान ठरणारी चळवळ -राजेश भंडारी
अहमदनगर (प्रतिनिधी)- महावीर ग्रुपच्या वतीने शहरात रक्तदान शिबिर राबविण्यात आले. महावीर ग्रुपचे चेअरमन राजेश भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या रक्तदान शिबिराला ग्रुपच्या सदस्यांसह मित्र परिवार व युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी पिंटूशेठ कटारिया, विलास कटारिया, मयूर शेटिया, ॲड. जयवंत भापकर, भानुदास ठुबे, रामचंद्र इंगळे, प्रभाकर बोरकर, गणेश गोंडाळ आदी उपस्थित होते.
राजेश भंडारी म्हणाले की, रक्तदान ही गरजू रुग्णांना जीवदान ठरणारी चळवळ आहे. रक्त हा असा घटक आहे की, तो कृत्रिमरित्या तयार होत नाही. रक्तासाठी मनुष्याला मनुष्यावरच अवलंबून रहावे लागत आहे. या सामाजिक चळवळमध्ये प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे. सामाजिक बांधिलकीने प्रत्येकाने रक्तदान चळवळीत योगदान देण्याचे त्यांनी आवाहन केले.

रक्तदान शिबिरासाठी जनकल्याण रक्तपेढीचे सहकार्य लाभले. रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.