• Wed. Jul 2nd, 2025

शहरात रंगली महेफिले शायरी

ByMirror

Jul 31, 2024

इदारा अदबे इस्लामी शाखा अहमदनगर आणि इक्बाल एज्युकेशन सोसायटीचा उपक्रम

उर्दू साहित्याला संजीवनी मुशायरा व शायरी मैफल मधून मिळत आहे -नवीद विजापुरे

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- उर्दू साहित्याला संजीवनी देण्याचे कार्य मुशायरा व शायरीच्या मैफल मधून होत आहे. भारतात उर्दू साहित्याला देखील महत्त्व असून, अनेक दुर्मिक साहित्य हे उर्दू मध्ये आहे. उर्दू साहित्याचा वारसा पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी उर्दू साहित्य क्षेत्रात काम करणाऱ्या युवकांची असल्याची भावना नवीद विजापुरे यांनी केली.


इदारा अदबे इस्लामी शाखा अहमदनगर आणि इक्बाल एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महेफिले शायरी कार्यक्रमाचे उद्घाटन मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सरचिटणीस मन्सूर शेख यांच्या हस्ते मेणबत्ती प्रज्वलीत करुन करण्यात आले. यावेळी अध्यक्षीय भाषणात विजापुरे बोलत होते. मुंबईतील सुप्रसिद्ध कथा लेखिका आणि कवयित्री डॉ. सय्यदा तबस्सुम नाडकर यांच्या सन्माणार्थ महेफिले शायरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शम्स हाजी समीर खान, उबेद शेख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


या काव्य सत्राचे प्रारंभ जामिया मोहम्मदिया बाराबाभळी मदरसाचे कारी अन्वर यांनी शहरातील ज्येष्ठ दिवंगत शायर हिम्मत अहमदनगरी यांनी लिहिलेल्या हम्द (प्रार्थना) च्या पंक्तीने आपल्या सुमधुर आवाजात केली. मुनव्वर हुसैन यांनी सूत्रसंचालन करताना जो पालन हार जग का…, उससे हिम्मत माँग तू! या हिम्मत अहमदनगरीच्या काव्य पंक्ती सादर केल्या.


शरीफ खान यांनी स्त्री जन्माचे स्वागत व स्त्री शिक्षणावर गझल सादर केली. त्यांनी सादर केलेल्या उंचे मकाम पर नजर आती है बेटीया…, बेटो से ज्यादा पढकर दिखाती है बेटीया… पराया धन ना समझो और पढाओ… दोनो घरो की शान बढाती है बेटीया! या गझलला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. नफीस हया यांनी मुलीच्या कर्तबगारीवर गझल मध्ये अंधेरो से डरा करती थी लडकी… वही जांबाज होती जा रही है… चे सादरीकरण केले.


रिमझिम पावसाच्या सरी कोसळत असताना, एकापेक्षा एक सरस शायरी, गझलने कार्यक्रमाची रंगत वाढत गेली. यामध्ये डॉ. कमर सरूर, नवीद बिजापुरे, सलीम यावर, मुनव्वर हुसैन यांनी आपल्या उत्कृष्ट शायरीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. वाह ऽ.. वाह.., बहोत खूब… क्या कहने… मुकुर्रर… इरशादच्या गजरात उपस्थितांनी शायरी मैफलला प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुनव्वर हुसैन यांनी केले. यावेळी मौलाना हमीद साहब, हाफिज बिलाल, आबिद खान, अलीमुद्दीन रंगरेज, जावेद खान आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *