औटी कुटुंबीयांच्या वतीने खिचडीचे वाटप
आषाढी एकादशी ही भक्तीचे प्रतीक -रामदास फुले
नगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील नेप्ती येथील श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त भक्तिभावपूर्ण वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. औटी कुटुंबीयांच्या वतीने मंदिरात महाभिषेक करण्यात आला. यावेळी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला.
औटी कुटुंबीयांच्या वतीने खिचडचे भाविकांमध्ये वाटप करण्यात आले. मंदिर परिसराची स्वच्छता आणि गाभाऱ्याची सजावट वंदना औटी, शोभा औटी, मीनल औटी, चैताली औटी आणि अश्विनी औटी यांनी केली. महाभिषेकानंतर मंदिरात महाआरती पार पडली. या प्रसंगी पुरोहित चंद्रकांत औटी व नारायण औटी यांच्या हस्ते खिचडीचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्यावेळी अभिजीत औटी, अक्षय औटी, अमोल औटी, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शिवाजीराव होळकर, समता परिषदेचे तालुका अध्यक्ष रामदास फुले, माजी उपसरपंच सुभाष जपकर, अमोल चौगुले, पोपट राऊत, किशोर चौगुले, पाराजी होळकर, बाळासाहेब होळकर, दत्तू कांडेकर, चंद्रकांत खरमाळे, दादा जपकर, ज्ञानेश्वर होळकर, अशोक रावळे, शौनक औटी, श्राव्या औटी, वेद औटी, शुभ्रा औटी, शुभंकर औटी आदींसह परिसरातील ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रामदास फुले म्हणाले की, औटी कुटुंबीयांनी जो सातत्यपूर्ण उपक्रम राबवला आहे, तो समाजाला एक सकारात्मक दिशा देणारा आहे. मंदिराची स्वच्छता, महाभिषेक, महाआरती आणि महाप्रसाद वाटप या सगळ्यांतून एकत्रितपणे भक्तीचे दर्शन घडले व त्याचा भाविकांना लाभ मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
विठ्ठल भक्तीत तल्लीन होवून औटी परिवाराने धार्मिक कार्यास हातभार लावला आहे. धार्मिक कार्यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे. आषाढी एकादशी ही भक्तीचे प्रतीक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.