• Tue. Jul 1st, 2025

भाळवणीच्या शनि मंदिरात आमदार काशिनाथ दाते यांच्या हस्ते महाआरती

ByMirror

Mar 30, 2025

धार्मिक सोहळ्यास भाविकांची मांदियाळी; मंदिराच्या सभा मंडपाने आमदार दाते नवस फेडणार

नगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील भाळवणी (माळवाडी) येथे आज शनि अमवस्या निमित्त शनिवारी (दि.29 मार्च) शनि मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी ह.भ.प. यशवंत महाराज थोरात यांचे प्रवचन झाले. प्रवचनानंतर आमदार काशिनाथ दाते यांच्या हस्ते शनि देवाची महाआरती करण्यात आली.


या धार्मिक सोहळ्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, भाजपा जिल्हा कोषाध्यक्ष दादासाहेब बोठे, भाजप पारनेर तालुकाध्यक्ष राहुल पाटील शिंदे, भाजपा राज्य सदस्य विश्‍वनाथ कोरडे, वसंतराव चेडे, सुजित झावरे पाटील, विजूभाऊ औटी, अरुण आंधळे पाटील, हंगे उपसरपंच मायाताई साळवे, देवेंद्र गावडे, सरपंच लिलाबाई रोहोकले, उपसरपंच आप्पादादा रोहोकले आदी उपस्थित होते.


भाळवणी येथील शनैश्‍वर प्रतिष्ठानच्या वतीने आमदार काशिनाथ दाते यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारुढ पुतळा भेट देऊन सत्कार करण्यात आला. आमदार दाते यांनी आमदार होण्यापूर्वी शनैश्‍वर महाराजांना केलेला नवस फेडण्यासाठी मंदिरासाठी सभामंडप बांधण्याचे जाहीर केले. ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.


शासकीय सेनापती बापट कॉलेजच्या शासकीय समिती सदस्यपदी जगदीश रघुनाथ आंबेडकर, पीएसआय झालेले शुभम बबन चेमटे व राहुल बांगर यांचा आमदार दाते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शनि अमवस्यानिमित्त गिताराम निमसे व उदय मेघवाल यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते. भाऊसाहेब चेमटे यांनी भाविकांना खिचडीचे वाटप केले. नंदुशेठ चेमटे यांनी थंड पाण्याची व गोविंदशेठ कुंभकर्ण यांनी मंडपाची सेवा दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.वाय. रोहोकले व संदीप ठुबे यांनी केले. धार्मिक सोहळा यशस्वी करण्यासाठी शनैश्‍वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष जगदीश आंबेडकर, सुजित आंबेडकर, निलेश डोळस, रमेश रोहोकले, डॉ. अभिजित रोहोकले, संतोष रोहोकले, मारुती रोहोकले, बाबासाहेब डोळस आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *