• Wed. Oct 15th, 2025

अरुणकाका जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी श्री विशाल गणपती मंदिरात महाआरती

ByMirror

Apr 8, 2025

अरुणकाका बरे होवून सुखरुप शहरात परतण्यासाठी श्री विशाल गणेशाला साकडे

नगर (प्रतिनिधी)- ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात मंगळवारी (दि.8 एप्रिल) सकाळी महाआरती करण्यात आली. अरुणकाका बरे होवून सुखरुप शहरात परतावे यासाठी श्री विशाल गणेशाला साकडे घालण्यात आले.


या आरतीसाठी श्री विशाल गणपती देवस्थानचे विश्‍वस्त प्रा. माणिक विधाते, माजी नगरसेवक संजय चोपडा, विजय गव्हाळे, मनोज कोतकर, मोहन (तात्या) कदम, दीपक सूळ, अमित खामकर, संजय सपकाळ, सुरेश बनसोडे, दीपक खेडकर, आनंद लहामगे, गजेंद्र भांडवलकर, भरत गारुडकर, निलेश बांगरे, संभाजी पवार, अमोल कांडेकर, निलेश इंगळे, राजू पडोळे, प्रभाकर इंगळे, अजय दिघे, बजरंग भुतारे, जालिंदर बोरुडे, पंडितराव खरपुडे, राजू कचरे, माऊली (मामा) गायकवाड, संजय मोरे, अनिल निकम, बाळासाहेब भुजबळ, प्रा. अरविंद शिंदे, माजी नगरसेविका मीनाताई चोपडा, आशाताई निंबाळकर, रेशमा आठरे, रेणुका पुंड, अरुणा गोयल, अलकाताई मुंदडा, स्मिता वाल्हेकर, अंबिका भिसे, उद्धव शिंदे, विशाल बेलपवार, शिवम भंडारी, मेजर गारुडकर, महेंद्र हिंगे, दिपक दरेकर, सर्जेराव तोरडमल, प्रा. भगवान काटे, अनिल निकम, विलास शिंदे, आनंद पुंड, किरण जावळे, संतोष हजारे, अनिकेत येमूल, लहू कराळे, विवेक गायकवाड, अभिजीत सपकाळ, मनीष फुलडहाळे, धर्मा करांडे, लकी खुबचंदानी, अक्षय घोरपडे, अरुण खिची, सुरज शहाणे, ओम पांडे, निलेश इंगळे, गजानन ससाणे, युवराज शिंदे, शैलेश अष्टेकर, सुजाता कदम, तुषार टाक आदींसह नगरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्यावर पुणे येथील खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, त्यांचा प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात महाआरती पार पडली. यावेळी सर्व भाविकांनी मनोभावे अरुणकाकांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी श्री विशाल गणेशाला साकडे घातले.


प्रा. माणिक विधाते म्हणाले की, श्री विशाल गणपती हे जागृक देवस्थान असून, सर्वांच्या मनातील इच्छा पूर्ण होतात. अरुणकाका बरे व्हावे ही सर्व नगरकरांच्या मनातील इच्छा आहे. सर्व समाज, जाती-धर्मातील लोकांशी काकांचे घनिष्ठ संबंध आहेत. मोठ्या प्रमाणात त्यांनी आपल्या कार्यातून माणसे जोडली असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी सर्व जाती-धर्माचे लोक प्रार्थना करत आहेत. लवकरच ते बरे होऊन परत शहरात यावे, ही सर्वांची मनापासून इच्छा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *