लहान वयात मुलांच्या भविष्याचा पाया रचला जातो -डॉ. प्रशांत महांडुळे
नगर (प्रतिनिधी)- शाहूनगर येथील ज्ञानसाधना एज्युकेशन फाउंडेशनची लंडन किड्स प्री स्कूल या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात पार पडले. चिमुकल्या मुलांनी रंगीबेरंगी पोशाख परिधान करून विविध गीतांवर आपली नृत्यकला सादर केली व उपस्थितांची मने जिंकली.
स्नेहसंमेलनाचे उद्घाटन डॉ. प्रशांत महांडुळे यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कमलेश भंडारी, मनपा स्थायी समितीचे माजी सभापती मनोज कोतकर, उद्योजक संभाजी पवार, जालिंदर कोतकर, माजी नगरसेवक अमोल येवले, उद्योजक दत्ताभाऊ जाधव, बच्चन कोतकर, अजित कोतकर, सुमित लोंढे, नगरसेवक प्रशांत गायकवाड, जयद्र्थ खाकाळ, छबुराव कोतकर, गोरखभाऊ कोतकर, अजित विधाटे, निलेश नाणेकर, महादेव हजारे, विकास खराडे, संस्थेचे अध्यक्ष दीपक तागडे, सचिव संदीप भोर, मुख्याध्यपिका रुचिता जमदाडे, शबाना शेख, शाहरुख शेख, संचालक प्रसाद जमदाडे आदीसह विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. प्रशांत महांडुळे म्हणाले की, लहान मुलांवर संस्कार रुजवून त्यांचे भविष्य घडवण्याचे कार्य शिक्षक करतात. लहान वयात मुलांच्या भविष्याचा पाया रचला जातो. आजची लहान मुले उद्याचे भविष्य घडवत आहे. त्यांच्यावर चांगले संस्कार झाल्यास सक्षम समाज घडणार आहे. मुले पालकांचे अनुकरण करतात. पालक मोबाईलपासून लांब राहिल्यास मुले देखील मोबाईलपासून लांब राहतील. आपल्या नावाने आई-वडिलांचा परिचय व्हावा, एवढे यश प्रत्येक विद्यार्थ्यांनी जीवनात नक्की मिळवावे. शाळेतील शिक्षकांडून ज्ञानदानाचे कार्य असेच चालू आहे. शाळा दिसताना छोटी असली तरी गुणवत्तेने शाळेचा नावलौकिक दूरवर पसरलेला असल्याचे त्यांनी सांगितले. उपस्थितांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.