• Sun. Nov 2nd, 2025

राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत लक्ष्मीबाई भाऊराव पाटीलचे सर्वाधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत

ByMirror

Apr 21, 2024

गुणवत्ता यादीत 99 विद्यार्थ्यांचा समावेश; पाच विद्यार्थी राज्याच्या गुणवत्तायादीत

गार्गी ठाणगे राज्यात पहिली

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत सर्वाधिक विद्यार्थी येण्याचा बहुमान रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयाने पटकाविला आहे. शैक्षणिक गुणवत्ता सिध्द करुन शाळेचे 6 विद्यार्थी राज्याच्या तर 20 विद्यार्थ्यांनी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. तर शहराच्या गुणवत्ता यादीत सर्वाधिक 73 विद्यार्थी चमकले आहे.


नुकतीच राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, शाळेचे एकूण 99 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. विद्यालयाने सलग तीन वर्ष जिल्ह्यात सर्वाधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत येण्याचा विक्रम केलेला आहे. राज्याच्या गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक- गार्गी संतोष ठाणगे (इयत्ता पहिली), राज्यात दुसरा क्रमांक- विनय नाबगे, प्रथमेश होले, सरफराज शेख (सर्व. इयत्ता दुसरी), राज्यात पाचवा क्रमांक- संस्कृती कापरे (इयत्ता दुसरी) यांनी मिळवला आहे.


जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत इयत्ता पहिली- रुद्र गुंजाळ, श्रीराज गुंजाळ, आराध्या जाधव, वरद नाबगे, इयत्ता दुसरी- आरोही सोनवणे, सिध्दवेदाय पेंडभाजे, आदिराज दराडे, आस्था सुंबे, अनुष्का धामणे, पार्थ जाधव, स्वरा दरेकर, वेदांत राहिंज, विराज काठमोरे, अर्श शेख, आयुष सोनमाळी, राजनंदिनी गांगर्डे, इयत्ता तिसरी- किर्ती शिरसे, अर्णव बोरुडे, इयत्ता चौथी- ईशान पालवे, रिओ शेख यांनी यश मिळवले आहे.


या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दादाभाऊ कळमकर, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे, रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्य अभिषेक कळमकर, अर्जुनराव पोकळे, अंबादास गारुडकर, विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे, बाबासाहेब नाईकवाडी, प्राचार्य छाया काकडे, मुख्याध्यापक शिवाजीराव लंके यांनी अभिनंदन केले.

या विद्यार्थ्यांना उर्मिला साळुंखे, मीनाक्षी खोडदे, सुजाता दोमल, शितल रोहोकले, जयश्री खांदोडे, शिल्पा कानडे, सोनाली अनभूले, रूपाली वाबळे यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे व शाळेचे पालक वर्गातून कौतुक व अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *