राज्य गुणवत्ता यादीत 15, जिल्ह्यात 29, शहरात 94 विद्यार्थी यशस्वी
नगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्थेच्या कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेने मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. या परीक्षेत शाळेतील तब्बल 138 विद्यार्थ्यांनी यश मिळवले असून, त्यातील 15 विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत, 29 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत आणि 94 विद्यार्थी शहर गुणवत्ता यादीत झळकले आहेत.
या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दादाभाऊ कळमकर, जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे, अभिषेक कळमकर, अर्जुनराव पोकळे, अंबादास गारुडकर, विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, सहविभागीय अधिकारी बाबासाहेब नाईकवाडी, प्रमोद तोरणे, प्राचार्या छाया काकडे, मुख्याध्यापक शिवाजी लंके यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
या विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख उर्मिला साळुंके, शिक्षिका मीनाक्षी खोडदे, सुजाता दोमल, शितल रोहकले, शिल्पा कानडे, जयश्री खांदोडे, सोनाली अनभुले, रूपाली वाबळे, भाग्यश्री लोंढे, भारती सुसरे, इंदुमती दरेकर, पुनम धाडगे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
मुख्याध्यापक शिवाजी लंके म्हणाले की, या गुणवंत विद्यार्थ्यांनी शाळेचे व शहराचे नाव राज्य पातळीवर उज्ज्वल केले आहे. हे यश केवळ विद्यार्थ्यांचे नव्हे, तर शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन व पालकांचे सहकार्याचे फलित आहे. शाळेत विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासापुरतेच मर्यादित न ठेवता त्यांच्यामध्ये विचारशक्ती, बुद्धिमत्ता आणि आत्मविश्वास यांचा विकास घडविण्याचे कार्य सुरु आहे. मंथनसारख्या स्पर्धा परीक्षेमुळे मुलांचे आकलन व चिंतनशक्ती वृद्धिंगत होत असल्याचे सांगून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक केले.
राज्य गुणवत्ता यादीत यशस्वी विद्यार्थी:
इ. 1 ली स्वरव अनभुले (4 था), स्वर्णिम मोकाटे (5 वा).
इ. 2 री श्रीराज गुंजाळ (1 ला), गार्गी ठाणगे (1 ली), युवराज भोर (2 रा), रुद्र गुंजाळ (2 रा), वेदांत अंधारे(4 था), आराध्या जाधव (5 वी), अद्वैत खेडकर (5 वा), वरद नाबगे (5 वा), विनय नाबगे (5 वा).
इ. 3 री आस्था सुंबे (3 री).
इ. 4 थी आरुषी बनकर (3 री), अथर्व अनभुले (4 था), आरुषी जाधव (5 वी).
–—
जिल्हा गुणवत्ता यादीतील यशस्वी विद्यार्थी:
इ. 1 ली सानवी कोहक (1 ली), अपूर्वा भोंडवे (2 री), आयुष गंभीरे (2 रा), अद्विका गाडीलकर (3 री).
इ. 2 री भक्ती बारगजे (1 ली), भूमी शिंदे (1 ली), शामवी हंबर्डे (2 री), श्रुती फसले (2 री), स्वरां अंधारे (3 री), दुर्वा भोसले (3 री), पृथ्वी पिंपळे (3 री), गायत्री कडूस (4 थी), शौर्य मुळे (4 था), हर्षनी नांगरे (4 थी).
इ. 3 री सरफराज शेख (1 ला), पार्थ जाधव (3 रा), आयुष सोनमाळी (3 रा), आरोही सोनवणे (5 वी).
इ. 4 थी कपिष टकले (1 ला), ओवी बडवे (2 री), आर्या जाधव (3 री), श्रेया रक्ताटे (3 री), वरद झावरे (3 रा), अर्णव बोरुडे (4 था), स्वराज कार्ले (4 था), कीर्ती शिरसे (4 थी), प्रज्ञेश जाधव (5 वा), कृष्णवीर जगदाळे (5 वा), अनय मुनफन (5 वा).