फळझाडांचे वाटप करुन पर्यावरण संवर्धनाचा संकल्प
देवराई उभारणीसाठी ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- येथील कृष्णाली फाउंडेशनच्या वतीने जामखेड तालुक्यातील पिंपळगाव आळवा व घोडेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. रिमझिम पावसाच्या साक्षीने झालेल्या या सोहळ्यात शालेय परिसरात विविध प्रकारची झाडे लावून फळझाडांचे वाटप देखील करण्यात आले.
हा कार्यक्रम अभिनेते सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून कार्यरत असलेल्या सह्याद्री देवराईचे मॅनेजिंग डायरेक्टर सचिन चंदने यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी सह्याद्री देवराई फाउंडेशनचे योगेश पंधेरे, सीआरएचपी जामखेडचे डॉ. जयेश कांबळे, सेवानिवृत्त वन अधिकारी घायतडक, महाराष्ट्र शासनाचे शास्त्रज्ञ डॉ. रणजीत राऊत, कृष्णाली फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटील शेळके, सचिव प्रियांका पाटील शेळके, खजिनदार अमर बोबडे, सह खजिनदार शिवाजी उबाळे, ग्रामपंचायत सदस्य बबनभाऊ बोबडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉ. सावता बोराटे, उपाध्यक्ष निळकंठ खवळे, अफसर शेख, किरण खवळे, विनोद बारवकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सचिन चंदने यांनी विद्यार्थ्यांना वृक्ष लागवडीचे महत्त्व, संवर्धन, संगोपन आणि पर्यावरण संतुलनाचे महत्त्व पटवून दिले. सह्याद्री देवराईच्या माध्यमातून सुरू असलेल्या उपक्रमांची माहितीही त्यांनी दिली. डॉ. जयेश कांबळे यांनी जामखेडमध्ये लोकसहभागातून वृक्ष लागवडीची मोठी चळवळ उभारण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे स्वागत मुख्याध्यापक अशोक घोडेस्वार यांनी केले. प्रास्ताविक प्रियांका पाटील शेळके यांनी केले. कृष्णाली फाउंडेशनने यापूर्वीही शालेय साहित्य वाटप, नव्या प्रवेशित विद्यार्थ्यांचा पालकांसह सत्कार असे उपक्रम राबवून शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. येत्या काळात जामखेड तालुक्यात एक भव्य देवराईफ उभी करण्याचा मानस असून त्यासाठी सह्याद्री देवराई फाउंडेशन आणि कृष्णाली फाउंडेशन यांचे संयुक्तपणे योगदान राहणार आहे.
यासाठीची प्राथमिक बैठक संपन्न झाली असून ग्रामस्थ व सरपंच यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले. या बैठकीत सरपंच शरद जगताप, मुख्याध्यापक अनिल यादव, पोलीस पाटील सुभाष पाटील, शिक्षक पाटील सर, राऊत सर, ढेंगळे मॅडम, घायतडक मॅडम, लक्ष्मण भांगे, वैशाली गवळी, उज्वला भोंडवे, सविता रासकर, अंगणवाडी सेविका लता गव्हाळे, आरोग्य सेवक स्वप्नील कुमटकर, सिस्टर सुनीता कार्ले, राठोड, वनपाल तेलंगे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवार सर यांनी केले. आभार डॉ. जयेश कांबळे यांनी मानले.