यादव आपल्या कार्यातून सर्वसामान्यांच्या मनातील सिंघम ठरले -विजय भालसिंग
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या कोतवाली हद्दीत शांतता, सुव्यवस्था अबाधित ठेवून आपल्या उत्कृष्ट कार्यातून सर्वसामान्यांसह महिला वर्गामध्ये विश्वास व सुरक्षित वातावरण निर्माण करणारे कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचा सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी सत्कार केला.
सहा महिन्यांपूर्वी कोतवाली पोलीस ठाण्याची जबाबदारी स्वीकारून चंद्रशेखर यादव यांनी कोतवाली हद्दीत गुन्हेगारांवर वचक बसविला आहे. अवैधधंदे चालविणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. गुंडगिरी करणारे व रोड रोमीयोंवर प्रतिबंधात्मक कारवाई करून खाकीचा धाक निर्माण केला.
त्यांच्या कार्यामुळे जनसामान्यांमध्ये पोलीस दलाबद्दल आपुलकीची भावना निर्माण झाली असून, रोड रोमीयोंच्या बंदोबस्ताने महिला व युवतींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे. तर संवेदनशील परिस्थिती हाताळून सण, उत्सावतही शांतता कायम ठेवण्याचे कार्य त्यांनी केले. अल्पावधीत ते सर्वसामान्यांच्या मनातील सिंघम ठरले असल्याची भावना भालसिंग यांनी व्यक्त केली.