• Tue. Jul 1st, 2025

गुढीपाडव्या निमित्त केडगावला रंगणार किर्तन महोत्सव

ByMirror

Mar 29, 2025

गुढीपाडव्या निमित्त पाच गोडाऊनच्या प्रांगणात किर्तनकाराची मांदियाळी

नगर (प्रतिनिधी)- गुढीपाडव्यानिमित्त केडगाव, शाहूनगर रोड येथील पाच गोडाऊनच्या प्रांगणात रविवार (दि.30 मार्च) पासून भव्य किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जनसेवक अमोल येवले मित्र मंडळ व छत्रपती फाउंडेशन (ट्रस्ट) यांच्या माध्यमातून गेल्या चार वर्षांपासून किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असून, यावर्षी किर्तन महोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.


आपली संस्कृती जोपासण्यासाठी अमोल येवले यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमातून केडगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांना दरवर्षी चांगली पर्वणी मिळत आहे. 30 मार्च ते 3 एप्रिल पर्यंत हा किर्तन महोत्सव चालणार आहे. यावेळी झी टॉकीज फेम असणारे सर्व कीर्तनकार सहभागी होणार आहेत. या किर्तन महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

किर्तन महोत्सवाचे दैनंदिन नियोजन पुढीलप्रमाणे:-
रविवार दि.30 मार्च ह.भ.प. अक्षय महाराज उगले (जेऊन हवेली ता नेवासा )
सोमवार दि.31 मार्च ह.भ.प. डॉ. प्रविण महाराज दुशिंग पाटील (शिवचरित्रकार वैजापूर),
मंगळवार दि.1 एप्रिल ह.भ.प. सोपान महाराज कनेरकर (समाज प्रबोधनकार युवा व्याख्याते)
बुधवार दि.2 एप्रिल ह.भ.प. जयश्री ताई येवले भागवताचार्य,( मु पो पाचाणे, ता. मावळ, जि. पुणे)
गुरुवार दि.3 एप्रिल ह.भ.प.गणेशजी शिंदे, (संत तुकाराम महाराज यांच्या जीवनावरीलआधारित संगीतमय सोहळा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *