आमदार जगताप यांनी केला सत्कार
मिश्रा याने स्केटिंग स्पर्धेत मिळवलेले यश सर्व नगरकरांच्या दृष्टीने अभिमानास्पद -आ. जगताप
नगर (प्रतिनिधी)- शहरातील खेळाडू स्केटिंग कार्तिक रत्नेश मिश्रा याची खेलो इंडिया स्पर्धेत आईस हॉकी स्केटिंग प्रकारात निवड झाली आहे. मिश्रा यांची निवड झाल्याबद्दल आमदार संग्राम जगताप यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी गौरव कराळे उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप यांनी मिश्रा यांनी शहराचे नाव उंचावले असून, त्याने स्केटिंग स्पर्धेत मिळवलेले यश सर्व नगरकरांच्या दृष्टीने अभिमानास्पद असल्याचे सांगितले. तर पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
नुकतेच पुणे येथे आईस हॉकी स्केटिंग स्पर्धेची निवड चाचणी पार पडली. यामध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केल्याबद्दल मिश्रा यांची लेह लदाख येथे होणाऱ्या खेलो इंडिया अंतर्गत आईस हॉकी स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यापूर्वी देखील मिश्रा याने दुबई येथे झालेल्या साऊथ एशियन गेम्स मध्ये स्केटिंग मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करुन उत्कृष्ट प्रदर्शन केले होते.
मिश्रा हा शहरातील ऑक्झिलियम कॉन्व्हेंट स्कूल व पॉलीटेक्निकचा माजी विद्यार्थी आहे. स्केटिंगचे दिवंगत प्रशिक्षक मनोज करपे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने स्केटिंगचे धडे गिरवले आहे. सध्या तो स्वत: सराव करत असून, भारती विद्यापीठ पुणे येथे सिव्हिल इंजिनिअरिंगचे शेवटच्या वर्षात शिक्षण घेत आहे. या निवडीबद्दल ऐम स्पोर्ट्स अकॅडमीचे शुभम कर्पे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. या यशाबद्दल मिश्रा यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर पदक पटकाविणाऱ्या अनुराधा मिश्रा यांचा तो मुलगा आहे.