शहीद जवानांना श्रध्दांजली
कारगिल विजय दिवस हा भारतीय सैनिकांचे शौर्य, धैर्य आणि बलिदानाचा गौरव -ॲड. आरती शिंदे
नगर (प्रतिनिधी)- मेरा युवा भारत व उडान फाउंडेशनच्या वतीने रतडगाव, बारादरी (ता. नगर) येथे कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. दादा पाटील माध्यमिक विद्यालयात झालेल्या कार्यक्रमात कारगिल युध्दात शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

कारगिल विजय दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी उडान फाउंडेशनच्या अध्यक्षा ॲड. आरती शिंदे, मुख्याध्यापक श्याम नानेकर, शिक्षक बाबासाहेब पालवे, लक्ष्मण पालवे, भाऊसाहेब साबळे, प्रियंका वाघचौरे, स्वाती लांडगे, प्रिया गर्जे, दत्तू बनसोडे, राजू मोहिते, दत्तू जाधव, अक्षय शिंदे, भारती शिंदे आदी उपस्थित होते.
ॲड. आरती शिंदे म्हणाल्या की, कारगिल विजय हा प्रत्येक भारतीयांचा अभिमान आहे. या युद्धात शहीद झालेल्या सैनिकांचे स्मरण ठेवले पाहिजे. 1999 मध्ये भारतीय आणि पाकिस्तानी सैन्यांमध्ये युद्ध झाले. पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय हद्दीत कारगिलच्या उंच ठिकाणी घुसखोरी केली होती. भारतीय सैनिकांनी त्याला चोख उत्तर देऊन पाकिस्तानी सैनिकांना परतून लावले. कारगिल विजय दिवस हा भारतीय सैनिकांचे शौर्य, धैर्य आणि बलिदानाचा गौरव असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी मुख्याध्यापक श्याम नानेकर यांनी विद्यार्थ्यांना कारगिल युध्दाची पार्श्वभूमी सांगितली.
या कार्यक्रमासाठी मेरा युवा भारत जिल्हा समन्वय अधिकारी सत्यजित संतोष, रमेश गाडगे, सिद्धार्थ चव्हाण व जय युवा ॲकॅडमीचे अध्यक्ष ॲड. महेश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.