• Fri. Apr 3rd, 2026

जिजाऊ ब्रिगेडच्या मुंबई महाअधिवेशनाला आजपासून प्रारंभ

ByMirror

Apr 2, 2026

महिलांना सहभागी होण्याचे अनिता काळे यांचे आवाहन

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महिलांचे सामाजिक, सांस्कृतिक व वैचारिक संगठन असलेल्या जिजाऊ ब्रिगेडचे दि.3 एप्रिल रोजी राज्यस्तरीय महाअधिवेशन छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर, मुंबई (दादर) येथे आयोजित करण्यात आलेले आहे. या अधिवेशनासाठी महाराष्ट्रभरातून हजारो महिला पदाधिकारी सहभागी होणार आहेत. या महाअधिवेशनातील वैचारिक प्रबोधनाचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा समन्वय परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षा अनिता काळे यांनी केले आहे.


महाअधिवेशन एकूण चार सत्रामध्ये पार पडणार असून या भव्य कार्यक्रमाचे उद्घाटन मुंबई महानगरपालिकेच्या महापौर रितूताई तावडे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा सीमा बोके असणार आहेत. तसेच आमदार मंदाताई म्हात्रे, नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील आणि ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांचीसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते यांचे मार्गदर्शन लाभणार असून, जिजाऊ ब्रिगेडच्या विशेषांकाचे प्रकाशन होणार आहे. या अधिवेशनासाठी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. पुरुषोत्तम खेडेकर, शिवधर्म संसद सदस्य शिवमती रेखाताई खेडेकर तसेच मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष इंजि. विजय घोगरे, राज्य कार्याध्यक्ष नवनाथ घाडगे, प्रदेश महासचिव चंद्रशेखर शिखरे, जिजाऊ ब्रिगेड महासचिव स्नेहा खेडेकर, आंतरराष्ट्रीय अध्यक्षा मयुरा देशमुख, राष्ट्रीय अध्यक्ष निर्मला पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.


या अधिवेशनासाठी जिजाऊ ब्रिगेडच्या राज्य उपाध्यक्ष अंजली भोसले, मुंबई अध्यक्ष स्मिता देसाई, नवी मुंबई अध्यक्ष भारती पाटील, महासचिव सरिता सोमवंशी, कार्याध्यक्ष मनीषा देसाई, ठाणे जिल्हाध्यक्ष सुनिता पाटील व मुंबईची सर्व टिम अथक परिश्रम घेत आहेत. अधिवेशनाकरिता अहिल्यानगर जिल्ह्यातील मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित राहण्याचे मराठा समन्वय परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षा अनिता काळे यांनी म्हंटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *