• Sat. Feb 14th, 2026

जयश्री बिरलिंगे उत्कृष्ट गायिका व अभिनेत्री पुरस्काराने सन्मानित

ByMirror

Nov 27, 2025

बहुजन भूमी संघटना व दक्ष पोलीस मित्र संघाच्या वतीने पुण्यात झाला गौरव


कला-सांस्कृतिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कला-सांस्कृतिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल अभिनेत्री तथा गायिका जयश्री बिरलिंगे यांना बहुजन भूमी संघटना व दक्ष पोलीस मित्र संघाच्या वतीने उत्कृष्ट गायिका व अभिनेत्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


वानवडी पुणे येथील महात्मा ज्योतिबा फुले सभागृहात झालेल्या सन्मान सोहळ्यात अभिनेत्री जयश्री बिरलिंगे यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील काजी हैदर शेख यांचे तेरावे वंशज सोहेल शेख व कोळी नटसम्राट राजेश खर्डे वेसावकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलास पठारे, राष्ट्रीय महिला अध्यक्षा रोहिणीताई भोसले व राष्ट्रीय उपाध्यक्ष रशिद पठाण, राष्ट्रीय वरिष्ठ अध्यक्ष कीर्ती पांडे, राष्ट्रीय युवक अध्यक्ष राहुल पाईकराव, महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष पल्लवी पाटील, कान्होपात्रा तांबारे, उपमहाराष्ट्र केसरी पै. सादिक पठाण, राजेश भाऊ आदी मान्यवर उपस्थित होते.


अभिनेत्री जयश्री बिरलिंगे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, नातेपुते या मुळगावचे आहेत.त्यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनय व गायनाने प्रेक्षकांची मने जिंकले आहे. त्यानीं अनेक वेब सिरीज, शॉर्ट फिल्म मध्ये काम केले असून, टी.व्ही.सिरीयल कलर्स मराठी वरील सिंधुताई माझी माय या मालिकेत नमु ताईची भूमीका त्यांनी केली आहे. झी मराठीवरील कारभारी लय भारी या मालिकेत देखील त्यांनी काम केले आहे. तसेच मराठी चित्रपटात देखील त्यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. त्यांना समाज कार्यासह आवड भजन, गायनाची आवड आहे. त्या उत्कृष्ट निवेदिका देखील आहेत.


अभिनेत्री जयश्री बिरलिंगे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी त्यांचे विशेष अभिनंदन करुन त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *