शहीद जवानांच्या स्मरणार्थ कोल्हार उदरमलला वटवृक्षाची लागवड
माजी सैनिकांनी पर्यावरण रक्षणाची उचलेली सामाजिक जबाबदारी अभिमानास्पद -आनंद भंडारी
नगर (प्रतिनिधी)- जय हिंद फाउंडेशनच्या वतीने कारगील विजय दिवस वृक्षारोपणाने साजरा करण्यात आला. कारगील मध्ये शहीद झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ कोल्हार उदरमल (ता. पाथर्डी) येथील रस्त्यालगत झाडांची लागवड करण्यात आली. कारगील विजय दिनाला 26 वर्ष पूर्ण होत असल्याने 26 वटवृक्षाची लागवड करुन वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन या अभियानाचे प्रारंभ करण्यात आले. यावेळी पाथर्डी तालुक्याचे गट विकास अधिकारी संगीता पालवे, जिल्हा परिषदचे विजय कोरडे, पाथर्डी पंचायत समिती कृषी विस्तार अधिकारी विष्णू पालवे, लक्ष्मण नांगरे, जय हिंदचे शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, भाऊसाहेब पालवे, बबनराव पालवे, सरपंच बाबाजी पालवे, उपसरपंच गोरक्ष पालवे, बाळासाहेब पालवे, ग्रामपंचायतचे सदस्य सोपानराव पालवे, ईश्वर पालवे, शर्माभाऊ पालवे, आजिनाथ पालवे, महादेव पालवे, आदिनाथ पालवे, नवनाथ जावळे, अंकुश पालवे, आजीनाथ जावळे, ग्रामसेवक शिवाजी पालवे, किशोर चेमटे, अनिल जायभाये आदी उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी म्हणाले की, देश रक्षणाचे कर्तव्य बजावून माजी सैनिकांनी पर्यावरण रक्षणाची उचलेली सामाजिक जबाबदारी अभिमानास्पद आहे. ज्याप्रमाणे वटवृक्ष दिर्घायु असून, त्याप्रमाणे वीर जवानांच्या स्मृती चिरंतर समाजात राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवाजी पालवे म्हणाले की, जवान सिमेवर देशाचे रक्षण करीत आहे. तर माजी सैनिक देशात पर्यावरणाचे रक्षण करुन, भावी पिढीच्या भवितव्यासाठी योगदान देत आहे. भविष्यात प्रत्येकाला निसर्गाच्या संकटाशी सामना करावा लागणार आहे. या लढ्यात प्रत्येकाने पर्यावरण संवर्धनासाठी लढा दिल्यास विजय निश्चित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.