• Tue. Mar 10th, 2026

जे.एस.एस. गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी साजरी केली दत्त जयंती

ByMirror

Dec 16, 2024

शाळेने विद्यार्थ्यांना घडवली भक्तीमय सहल

विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर धार्मिकता आणि संस्कार रुजवण्याचे कार्य -आनंद कटारिया

नगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील जे.एस.एस. गुरुकुलच्या विद्यार्थ्यांना दत्त जयंतीनिमित्त सरोदे नगर येथील दत्त मंदिरात सहल घडविण्यात आली. विद्यार्थ्यांनी दत्त मंदिरात दर्शन घेऊन त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. विद्यालयाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीच्या वारसा जपून शिक्षणाबरोबरच संस्कार रुजविण्याचे कार्य सुरु असून, या उपक्रमातंर्गत शाळेच्या वतीने दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.


धार्मिक वातावरणात विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे दत्त मंदिरास भेट दिली. शाळेचे प्राचार्य आनंद कटारिया यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. मंदिरात दर्शनास आलेल्या विद्यार्थ्यांना श्री गुरुदेव दत्त देवस्थान ट्रस्ट सरोदे नगर यांच्या वतीने प्रसादचे वाटप करण्यात आले. यावेळी प्राचार्य आनंद कटारिया, अनिता खुर्जेकर, वैशाली देशमुख, हर्षा कार्ले, अयोध्या कापरे, जोशी, शितल भुजबळ, आरती, बिना, अनुपमा तोडमल, देवस्थान ट्रस्टचे पोपटराव सरोदे, महेश सरोदे, दत्तात्रय भगत, आकाश जरे, आकाश शहाणे, माऊली तोडमल, योगेश सरोदे, सचिन सरोदे, सागर कराळे, मयुर औटी आदींसह परिसरातील नागरिक, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आनंद कटारिया म्हणाले की, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देताना त्यांच्यात धार्मिकता आणि संस्कार रुजवण्याचे कार्य केले जात आहे. भारतीय संस्कृतीचा वारसा जपण्याचे काम शाळा करत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांना दत्त जयंतीची माहिती देऊन ब्रह्मा, विष्णू, महेशची अनुभूती घडविण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *