• Mon. Jan 26th, 2026

भिंगारची आंतरराष्ट्रीय धावपटू पूजा वराडे झाली पोलीस उपनिरीक्षक

ByMirror

Apr 15, 2024

आंतरराष्ट्रीय धावपटू ते पोलीस अधिकारी होण्याचा मिळवला मान

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील आंतरराष्ट्रीय धावपटू पूजा रमेश वराडे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करुन तिची पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या वराडे हिने आंतरराष्ट्रीय धावपटू ते पोलीस अधिकारी होण्याचा मान मोठ्या जिद्दीने मिळवला आहे.


आंतरराष्ट्रीय धावपटू असलेल्या व भिंगार एक्सप्रेस म्हणून ओळख निर्माण केलेल्या पूजा वराडे हिने पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. पूजा हीचे प्राथमिक शिक्षण, भिंगार हायस्कूल येथून व माध्यमिक शिक्षण न्यू आर्टस ॲण्ड कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयात पदवी शिक्षण घेतले आहे. पूजाचे वडील रमेश वराडे राज्य परिवहन मंडळाचे निवृत्त कर्मचारी आहे. तर आई सुनिता वराडे गृहिणी असून, दोघांनी तिला स्पर्धा परीक्षेसाठी प्रोत्साहन दिले.


पूजाने शालेय जीवनापासूनच अधिकारी होण्याचे स्वप्न मनाशी बाळगले होते. तर ती उत्कृष्ट धावपटू असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर बक्षीस पटकाविले आहे. पूजा वराडे हिने आपले यशाचे श्रेय आई, बाबा व मोठा भाऊ कौस्तुभ यांना दिले असून, प्रत्येकाकडे एक कला असते ती दाखवण्याची हिंमत दाखवयाला हवी. प्रत्येकाच्या आयुष्यात कमी अधिक प्रमाणात संकटे येतात. त्या संकटांना तुम्ही कसे सामोरे जाता? यावर यश निर्भर करत असल्याचे असते. यशासाठी जिद्द, चिकाटी, संयम ठेवण्याचे तिने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *