जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
छत्रपती शिवाजी महाराज जयंती, मौलाना आजाद पुण्यतिथी आणि जागतिक मातृभाषा दिवसाचा उपक्रम
नगर (प्रतिनिधी)- शहरातील नागोरी मुस्लिम मिसगर जमाअत ट्रस्ट संचलित अहमदनगर उर्दू हायस्कूल व मिसगर ज्युनिअर कॉलेजमध्ये जिल्हास्तरीय आंतरशालेय उर्दू शुद्धलेखन स्पर्धा उत्साहात पार पडली. छत्रपती शिवाजी महाराज जयंती, मौलाना आजाद पुण्यतिथी आणि जागतिक मातृभाषा दिवसानिमित्त घेण्यात आलेल्या या स्पर्धेला जिल्ह्यातील उर्दू माध्यमांच्या शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

स्पर्धेच्या बक्षीस वितरणाप्रसंगी प्रादेशिक विद्या प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर अधिव्याख्याता तथा उर्दू विभाग प्रमुख पांडुरंग चव्हाण, केंद्रसमन्वयक फिरोजखान पठाण, युआरसी मनपाचे जावेद सर, विषय तज्ञ शशिकांत गिते, आयडियल स्कूलचे मुख्याध्यापक अब्दुल पटेल, हवालदार अब्दुल हमीद शाळेच्या मुख्यध्यापिका समिना खान, आलमगीर जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळेच्या मुख्यध्यापिका जाकेरा शेख, दर्गादायरा जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळेच्या मुख्यध्यापिका यास्मीन शेख, केडगाव जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळेच्या मुख्यध्यापिका आस्मा शेख, भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्ड जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळेच्या मुख्यध्यापिका मुबिना सय्यद, फकीरवाडा जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळेच्या मुख्यध्यापिका अंजुम शेख आदी उपस्थित होते.
या सोहळ्याचे प्रारंभ उर्दू की पहचान है हम, पहचान हमारी उर्दू…. या उर्दू गीताने करण्यात आली. कार्यक्रमासाठी शालेय शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले.
या स्पर्धेतील प्रथम विजेते जिल्हा परिषद उर्दू शाळा आलमगीर, द्वितीय विजेते महात्मा गांधी उर्दू शाळा कँटोन्मेंट बोर्ड, भिंगार, तृतीय क्रमांक आयडियल उर्दू शाळा मुकुंदनगर आणि चतुर्थ क्रमांकाचे विजेते जिल्हा परिषद उर्दू शाळा दर्गादायरा यांना अनुक्रमने 1 हजार, पाचशे, तीनशे रुपये रोख आणि प्रशस्तीपत्रक, सन्मान चिन्ह व मेडल देण्यात आले.
प्रास्ताविक मुनव्वर खान यांनी केले. अध्यक्षपदाची घोषणा जफर शेख यांनी केले. त्यास अनुमोदन मुजाहेद पठाण यांनी दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुसैब शेख नौशाद व मौलवी वसिम हनिफ यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजहर सर, रियाज सर, नौशीन बाजी, फिरदौस खान, जमजम बाजी आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.