अंधारामुळे अनेक लहान-मोठे अपघात घडत असल्याचा दावा
युवा सेनेचे अतिरिक्त आयुक्तांना निवेदन
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-कल्याण रोडवरील सीना नदीच्या पुलाचे काम सुरु असून, पर्यायी रस्त्यावर अंधारामुळे अनेक लहान-मोठे अपघात घडत असताना तातडीने पथदिवे बसविण्याची मागणी युवा सेनेच्या वतीने करण्यात आली.
मनपाचे अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांच्याशी या प्रश्नावर चर्चा करुन निवेदन देण्यात आले. यावेळी युवा सेनेचे शहर प्रमुख पै. महेश लोंढे, माजी नगरसेवक अनिल शिंदे, अमोल हुंबे, ओंकार शिंदे, सचिन ठाणगे, कुमार ठाकूर, राधे काकलीज आदी उपस्थित होते.
नगर-कल्याण रोडवरील सीना नदीच्या पुलाचे काम सुरू आहे. वाहनांना जाण्या-येण्यासाठी पर्यायी रस्ता करण्यात आला आहे. मात्र त्या रस्त्यावर पथदिवे नसल्याने रात्री पूर्णत: अंधकार असतो. पर्यायी रस्त्याने वाहतूक सुरु असून, लाईट नसल्याने अनेक लहान-मोठे अपघात घडत आहे. नागरिकांना अंधारात जीव मुठीत धरुन जावे लागते.
नुकतेच दोनते तीन दिवसांपूर्वी या रस्त्यावर अपघात झाला असून, एका युवकाचा जीव गेला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. तर सीना नदीच्या पुला जवळील पर्यायी रस्त्यावर तातडीने पथदिवे बसविण्याची मागणी युवा सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
नगर-कल्याण रोडवरील सीना नदीच्या पुलाचे काम सुरू असताना पर्यायी रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र रात्री लाईट नसल्याने अनेक अपघात होत आहे. नागरिकांना शहरात येण्यासाठी याच रस्त्यावरुन जावे लागत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये देखील भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मनपा प्रशासनाने तातडीने पथदिव्यांची व्यवस्था करावी. -पै. महेश लोंढे (शहरप्रमुख, युवा सेना)
