• Mon. Jan 26th, 2026

आनंद विद्यालयात 77 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

ByMirror

Aug 20, 2023

अहमदनगर (प्रतिनिधी)- गुलमोहर रोड येथील आनंद विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयात देशभक्ती जागवणाऱ्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीवर आधारित पारंपरिक खेळ, लाठी-काठी रिंगण विविध धाडदी प्रात्यक्षिके करून सर्वांचे लक्ष वेधले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रभात डेअरीचे संस्थापक सारंगधरजी निर्मल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शैक्षणिक वर्ष 2023 या वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत अस्मिता पालवे, विराज रणसिंग, मुग्धा हारदे या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मार्गदर्शक शिक्षिका स्वाती ननावरे व मनिषा पवार यांचाही सत्कार करण्यात आला.

यावेळी संस्था उपाध्यक्ष विलास शेटे, सचिवकिसन तरटे, दौलत शिंदे, संचालक शरद झंवर, विश्‍वनाथ पोखरकर, श्रीकांत अष्टेकर, दिलीप अकोलकर, सोनवणे मॅडम, माध्यमिक विभाग मुख्याध्यापिका शारदा पोखरकर, प्राथमिक विभाग मुख्याध्यापक प्रदीप दांगट आदींसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन धसे मॅडम यांनी केले. आभार बोडखे सर यांनी मानले. मा. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *