माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या संकल्पनेतून मा.आ. स्व. अरुणकाका जगताप यांच्या स्मरणार्थ उभारले शिव आभूषण
शिव आभूषण शिल्पातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समाजाला ऊर्जा व प्रेरणा देणारा ठरेल – आ. संग्राम जगताप
नगर (प्रतिनिधी)- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आभूषणाच्या प्रतिकृतीतून छत्रपतींचा इतिहास समाजासमोर आणण्याचे काम माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांनी केले आहे. बोल्हेगाव-नागापूर उपनगरामध्ये विकास कामांसाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे, आम्ही निवडणुकीपुरते काम करत नसून पाचही वर्ष जनतेच्या सुखदुःखामध्ये सामील होत असतो. नगर शहराचा विकासाचा रथ हा भगवान जगन्नाथाचा रथ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य मिळवत रयतेचे राज्य निर्माण केले आणि त्यांचा पुतळा बसवण्यासाठी आपल्याला परवानगी मिळत नाही. ही खेदाची बाब आहे. मात्र पुढिल काळात नक्कीच पुतळा बसवण्यासाठी तातडीने परवानगी मिळतील असे काम केले जाणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
बोल्हेगाव येथे मनपाचे माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या संकल्पनेतून माजी आमदार स्व. अरुणकाका जगताप यांच्या स्मरणार्थ शिवआभूषण प्रतिकृतीसह चौक शुशोभीकरण कामाचा लोकार्पण सोहळा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी सभापती कुमारसिंह वाकळे, बबनराव वाकळे, माजी नगरसेवक राजेश कातोरे, किसन भिंगारदिवे, ह.भ.प. भिवसेन कोलते, ह.भ.प. तुकाराम कातोरे, ह.भ.प. राधाकिसन कातोरे, नाथा वाटमोडे, रावसाहेब वाकळे, भाऊसाहेब वाकळे, बाळासाहेब वाकळे, ज्ञानदेव कापडे, मारुती कापडे, कांतिलाल वाकळे, नंदकुमार वाकळे, बाबासाहेब घोगरे, बबन वाकळे, सुभाष वाकळे, अरुण ससे, भाऊसाहेब आढाव, यशवंत परदेशी, तुकाराम आढाव, बाळासाहेब सोनवणे, दिलीप वाकळे, दत्तात्रय वाकळे, गोरख वाटमोडे, राजु देठे, संजय देठे, उत्तम भिंगारदिवे, विलास जाधव, अक्षय दुधाळ, हबीब शेख, महादेव कोकाटे, किसन कोलते, महेश कुलट, भीमा वाकळे, बबन कराळे, आसाराम कराळे, शिवाजी कराळे, रामकिसन बामदळे, बाबासाहेब पाडळे, राजेंद्र वाकळे, सचिन वाकळे, छबुराव वाकळे, एकनाथ वैराळ, इंद्रभान वर्पे, जालिंदर बोखारे, गंगाधर मंचरे, अरुण कातोरे, सुनील भालेराव, जीवन पगार, निवृत्ती ऊंडे, रवी चेमटे, लतिफ बेग, सुरेश आडसुळ, मोहन गाडे, रोहीदास आंबेडकर, शेखर खाकाळ, सुनील लोंमटे, गणेश कुलट, सागर शिंदे, बाळासाहेब गायकवाड, अरविंद आरखडे, अक्षय आंबेकर, अजय जगताप, अशोक पावले, राजू सय्यद, नवनाथ मदने, शिवाजी वाघ, रूपचंद कळमकर, संपत वाकळे, मच्छिंद्र वाकळे, भैरू आमले, आप्पा आमले, संजय जाधव, संतोष वाटमोडे, शंकर जारकर, सुधाकर ठाणगे, रमेश वाकळे, हरिदास वाटमोडे, पोपट वाटमोडे, मच्छिंद्र कळमकर, राहुल कराळे, मोहन वाकळे, गोरख कोलते, शरफुद्दीन सय्यद, दशरथ वाकळे, रमेश पुंड, विकीशेठ तिवारी, पवन चाफे, नरेंद्र मिसाळ, दिलीप राख, ऋषिकेश कराळे, वैभव शेवाळे, अशोक बहीर, संदीप काळनर, हरिशंकर गिरी, अमृतपाल गिल्ल, मुबारक शेख, धोंडीराम दुतारे, सतीश केदारी आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे आमदार जगताप म्हणाले की, आपण समाजाचे प्रश्न सोडवीत असल्यामुळे जनतेकडून विकासाच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत, त्या पूर्ण करत शहरातील प्रत्येक काम दर्जेदार व नियोजनबद्ध केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आभूषण कलाकृती या शिल्पातून समाजाला ऊर्जा व प्रेरणा मिळण्याचे काम होणार आहे. बोल्हेगाव-नागपूर या ग्रामीण भागाला मा. सभापती कुमारसिंह वाकळे यांनी विकास कामांतून शहरीकरणाचे रूप प्राप्त करून दिले आहे. आता चौक सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. आम्ही जनतेच्या प्रश्नांसाठी काम करत असून काही जण खोटे आरोप करून शहराची बदनामी करत आहे. भ्रष्टाचार झाला असता तर शहरातील रस्त्यांचे काम दिसलेच नसते! सकाळी 10 चा भोंगा हा जनतेच्या करमणुकीचा असून, तो समाजाच्या कामाचा नसल्याचेही त्यांनी सांगितले.
कुमारसिंह वाकळे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार देशाला प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या विचारावरच आपण सर्व चालत आहोत. त्यांनी शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या विविध योजना आज राज्यकर्ते राबवत आहे. बोल्हेगाव-नागापूर परिसरातील विविध भागांना, रस्त्यांना, कॉलनीना छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचे नाव देऊन त्यांचे विचार समाजामध्ये रुजविण्याचे काम केले आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या मुळेच या भागाच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली आहे. महानगरपालिकेवरती प्रशासन येऊन 2 वर्ष झाले आहे, तरी देखील विकासाची कामे आम्हीच करत आहोत. आम्हाला नगरसेवक नसल्यासारखे वाटतच नाही, कारण आम्ही जनतेच्या विचारांशी बांधील आहोत. जनतेने सांगितलेले काम तातडीने सोडवण्याचे काम आजही आम्ही करत असल्याचे ते म्हणाले. तसेच येसाजी कंक यांची भूमिका घेऊन संग्राम जगताप यांच्यावर चाल करुन आलेल्या राजकीय हत्तींना पाडल्याशिवाय येथील जनता स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.
बोल्हेगाव या परिसरामध्ये सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत असून सर्वांना बरोबर घेऊन काम करत असल्यामुळे जनतेचा विश्वास संपादन करू शकलो आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे अभूषण कलाकृती निर्माण केली असल्यामुळे, त्यांचा इतिहास समाजामध्ये रुजविण्याचे काम केले जाईल ही कलाकृती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा टोप, तलवार, ढाल यांची एकत्रित शिव आभूषण प्रतिकृती निर्माण केली आहे. त्यामुळे बोल्हेगावच्या वैभवात व सौंदर्यात भर पडली असल्याची माहिती कुमारसिंह वाकळे यांनी दिली.