• Thu. Oct 30th, 2025

तपोवन हॉस्पिटलचे उद्घाटन

ByMirror

May 23, 2024

रुग्ण सेवा हीच ईश्‍वर सेवा -डॉ. शरद मोहरकर

अहमदनगर (प्रतिनिधी)- तपोवन रोड, येथे तपोवन मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचे उद्घाटन नामदेव मोहरकर व सौ. पंचफुला मोहरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुरेश (अण्णा) धस, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार शिवाजी कर्डिले, युवा नेते अक्षय कर्डिले, मनोज कोतकर, संभाजी पवार, निखिल वारे, दत्ता तापकिरे, गजानन भांडवलकर, राजू मराठे, राहुल जगदाळे, जनार्धन माने, बबन कारंडे, राहुल पवार, प्रा. प्रसाद जमदाडे, अशोक खोकराळे, पै. प्रताप गायकवाड आदींसह परिसरातील उद्योजक, नागरिक व आष्टी येथील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.


आमदार सुरेश धस म्हणाले की, एका सर्वसामान्य कुटुंबातील व छोट्या गावातील मुलगा मोठ्या कष्टाणे डॉक्टर होऊन नगर शहरात आपले हॉस्पिटल उभे करतो ही अभिमानाची बाब आहे. उपनगर भागातील नागरिकांना उत्तमप्रकारे आरोग्यसेवा मिळावी यासाठी हॉस्पिटलची केलेली उभारणी कौतुकास्पद आहे. कोरोना काळात आपल्या जीवाची बाजी लाऊन डॉ. शरद मोहरकर यांनी आष्टी या ठिकाणी कोविड सेंटर उभारले. त्यांच्या माध्यमातून हजारो रुग्णांना जीवदान मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.


रुग्ण सेवा हीच ईश्‍वर सेवा असून, या भावनेने रुग्णांना सेवा दिली जाणार आहे. मोठे बंधू अमृत मोहरकर व सुनीता मोहरकर यांनी कष्ट करून मला शिकवले व आज डॉक्टर होवून रुग्णांची सेवा करता येणार आहे. बिकट परिस्थितीची जाणीव असल्याने सेवाभाव हा उद्देश ठेऊन रुग्णांचे आरोग्य जपले जाणार असल्याची भावना डॉ. शरद मोहरकर यांनी व्यक्त केली.


तपोवन हॉस्पिटलमध्ये अद्यावत आयसीयू विभाग, ऑपरेशन थेटर, स्पेशल रूम तसेच सर्पदंश, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयाचे विकार, अपघाती रुग्णासाठी तातडीची सेवा, सर्जरी आदीची सोय आहे. तसेच सरकारी योजनांचा लाभ रुग्णांना मिळणार असून, कॅशलेस सुविधा असून, पॅथॉलॉजिस्ट डॉ. रूपाली बांगर व एमडी मेडिसिन डॉ. शरद मोहरकर चोवीस तास रुग्णांसाठी उपलब्ध राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *