• Thu. Oct 16th, 2025

नागरदेवळे येथे श्रीकृपा मेडिकलचे उद्घाटन

ByMirror

Jul 5, 2024

वाढत्या शहरीकरणाबरोबरच आरोग्यसेवा देखील स्थानिक ठिकाणी मिळणे गरजेचे -मा.आ. अरुणकाका जगताप

अहमदनगर (प्रतिनिधी)- आलमगीर रोड, नागरदेवळे येथे श्रीकृपा मेडिकल ॲण्ड जनरल स्टोअर्सचे उद्घाटन मा. आ. अरुणकाका जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी भिंगार राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय सपकाळ, केमिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ गाडळकर, सुधीर लांडगे, मनोज खेडकर, डॉ. कुलांगे, बाजीराव हजारे, महादेव कराळे, संचालक संपतराव बेरड, तुषार बेरड, अविराज भांड, सुदाम गांधळे, मच्छिंद्र बेरड, दीपक लिपाणे, सर्वेश सपकाळ, मतीन ठाकरे, अभिजीत सपकाळ, अक्षय नागपुरे, रमेश वराडे, बाळू शहापूरकर, दिपक धाडगे, मनोहर दरवडे, दिलीप ठोकळ, रविंद्र जाधव, शुभम मिसाळ, ऋतिक गारुडकर, गणेश शिंदे आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.


अरुणकाका जगताप म्हणाले की, शहराचा विस्तार झपाट्याने वाढत आहे. भिंगार शहरानंतर नागरदेवळे देखील शहरालगत असून, मोठी लोकवस्ती वाढत आहे. वाढत्या शहरीकरणाबरोबरच आरोग्यसेवा देखील स्थानिक ठिकाणी मिळणे गरजेचे झाले आहे.

या भागातील नागरिकांना औषधांसाठी शहरात येण्याची गरज न भासता, श्रीकृपा मेडिकलच्या माध्यमातून औषधे उपलब्ध होणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. संपतराव बेरड यांनी नागरदेवळे भागातील गरज ओळखून मेडिकल सुरु करण्यात आली आहे. नागरिकांना आरोग्यसुविधा पुरविण्याच्या दृष्टीकोनाने सेवा दिली जाणार असून, सर्व प्रकारचे औषधी उपलब्ध करुन दिले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *