विविध क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नगर (प्रतिनिधी)- अहमदनगर हायस्कूलमध्ये क्रीडा सप्ताह मोठ्या उत्साहात पार पडले. क्रीडा सप्ताहाचे उद्घाटनाप्रसंगी यतीमखाना संस्थेचे चेअरमन हाजी सय्यद अलीम सत्तार, विद्यालयाच्या प्राचार्या सय्यद शाहीदा व विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी आकाशात फुगे सोडून क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शाळेत विविध क्रीडा स्पर्धा रंगल्या होत्या. प्राचार्या सय्यद शाहीदा यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व सांगून शुभेच्छा दिल्या. तर सर्व विद्यार्थ्यांना मैदानी खेळात सहभागी होण्याचे आवाहन केले.

चेअरमन हाजी अलीम सत्तार म्हणाले की, विद्यार्थ्यांना खेळ आणि अभ्यास यामध्ये समतोल राखला तर व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. खेळामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास होतो. सदृढ आरोग्यासाठी खेळ महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
क्रीडा सप्ताह यशस्वी करण्यासाठी समीना इनामदार, शेख मॅडम, नाझिया मॅडम, अहिरे मॅडम, अनिसा शेख परिश्रम घेत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघा कुलकर्णी यांनी केले.