• Tue. Jun 3rd, 2025

सक्कर चौक येथे जीत मोटर्स चेतक शोरुमचे उद्घाटन

ByMirror

Oct 8, 2024

बजाजच्या इलेक्ट्रिक स्कूटर होणार उपलब्ध

सर्वसामान्यांना परवडणारी ई स्कुटर प्रदुषणमुक्तीसाठी देखील उपयुक्त -आ. संग्राम जगताप

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील नगर-पुणे महामार्ग सक्कर चौक येथे नव्याने झालेल्या जीत मोटर्स चेतक शोरुमचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप व माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते झाले. या शोरुमच्या माध्यमातून नगरकरांना बजाजच्या इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध होणार आहे.


या उद्घाटन सोहळ्यासाठी श्री विशाल गणपती देवस्थानचे विश्‍वस्त प्रा. माणिक विधाते, नगर क्लबचे संचालक ॲड. जयंत भापकर, रवींद्र सोमानी, संजय सपकाळ, संभाजी पवार, विपुल शहा, उद्योजक इद्रजीत नय्यर, राजीव बिंद्रा, रवी बक्षी, किशोर मुनोत, जनक आहुजा, माजी महापौर भगवान फुलसौंदर, हेमचंद्र इंगळे, मनीष नहार, साहिल नहार, मनोज नहार, कुणाल चोप्रा,किशोर भिंगारवाला, श्‍याम रेणावीकर, सुरेश क्षीरसागर, जवाहर मुथा, डॉ. प्रवीण मुनोत, डॉ. कल्याण भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, घर घर लंगर सेवेचे हरजितसिंह वधवा, प्रीतपालसिंह धुप्पड, राकेश गुप्ता, बलजीत बिर्ला, रवी तलवार, राजेंद्र कंत्रोड, डॉ. धनंजय घैसास, चंद्रकांत गाडे, अनिल ॲबट, सुनील मुथा, मनोज मदान, अशोक जग्गी, अनिश आहुजा, जतीन आहुजा, विशाल पवार, सुभाष जग्गी, कार्तिक बिंद्रा, सुधीर तलवार, कैलाश नवलानी, सर्वेश सपकाळ, जितू गंभीर, चिंटू गंभीर, ज्ञानेश्‍वर रासकर, संजय गुगळे, धीरज नय्यर, अजय पंजाबी आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


संचालक अभिमन्यू नय्यर व अनुज बिंद्रा यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत करुन पेट्रोल, डिजेलला पर्याय व प्रदुषणमुक्त शहरासाठी बाजारपेठेत अद्यावत सोयी-सुविधांसह बजाजच्या चेतक प्रिमियम आणि चेतक अर्बन या ई स्कुटरला वाढत्या मागणीची माहिती दिली.


आमदार संग्राम जगताप म्हणाले की, वाहनांचे वाढते प्रदुषण पर्यावरणासाठी घातक ठरत असून, प्रदुषणमुक्तीसाठी इलेक्ट्रिक व्हीकल सर्वोत्तम पर्याय आहे. दिवसंदिवस वाहनांच्या संख्येत वाढ होत असून, इंधनाचे दर देखील गगनाला भिडत आहे. सर्वसामान्यांना कामानिमित्त ई स्कुटर परवडणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तर युवा उद्योजक म्हणून अभिमन्यू नय्यर यांनी चांगला नावलौकिक मिळवला आहे. ॲटोमोबाईल्स क्षेत्रात काम करताना अनेक युवकांना रोजगाराच्या संधी देखील त्यांनी उपलब्ध करुन दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.


शिवाजी कर्डिले म्हणाले की, पैश्‍याची बचत म्हणून इलेक्ट्रिक व्हीकलला नागरिकांची देखील पसंती मिळत आहे. बजाजच्या ई स्कुटरमध्ये असलेल्या गुण वैशिष्ट्यामुळे ग्राहकांची वाढती मागणी दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. ॲमेजॉन व फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या विविध ऑफर्ससह शोरुमच्या वतीने आकर्षक सुटचा लाभ ग्राहकांना मिळणार असल्याची माहिती शोरुमच्या वतीने देण्यात आली आहे.



बजाजच्या चेतक प्रिमियम व चेतक अर्बनची गुणवैशिष्टये:-
चेतक प्रिमियमचा टॉप स्पिड 73 कि.मी. प्रति तास पर्यंन्त आहे. एका चार्जमध्ये 126 किलोमीटर चालत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. तर चेतक अर्बनची टॉप स्पिड 63 कि.मी. प्रति तास पर्यंन्त आहे. एका चार्जमध्ये 113 किलोमीटर चालत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. दोन्ही मॉडेल पूर्णत: स्टील बॉडी व आकर्षक लुक मध्ये 5 रंगात उपलब्ध आहे. एक चार्ज 4:30 तास व अर्बन मध्ये 4 तास 50 मिनीटात चार्ज होते. इतर ई स्कुटरपेक्षा अधिक सोयी-सुविधांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. 3 वर्षाची 50 हजार किलोमीटर पर्यंन्तची वॉरन्टी देण्यात आली आहे.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *