ठराविक व्यक्तींकडे सत्तेची चक्रे फिरत असल्याने समतोल विकास साधला जात नाही -ॲड. अभय आगरकर
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराचा विस्तार झपाट्याने वाढत आहे. पूर्वी विकास कामांमध्ये राजकीय हस्तक्षेप होत नव्हता, मात्र सध्या मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप वाढला आहे. ठराविक व्यक्तींकडे सत्तेची चक्रे फिरत असल्याने समतोल विकास साधला जात नाही. विरोधकांना निधी कमी दिले जात असल्यामुळे मूलभूत सुविधांपासून नागरिक वंचित राहत आहे. शहरात भाजपच्या माध्यमातून समतोल विकास साधून, गटातटाचा भेदभाव न करता सर्वसामान्यांचे विकास कामे मार्गी लावले जात असल्याचे प्रतिपादन भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष ॲड. अभय आगरकर यांनी केले.

नगर-कल्याण रोड, प्रभाग क्रमांक 8 मधील गणेश नगर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून व खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून सभामंडपाचे कामाचे उद्घाटन ॲड. आगरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, विधानसभा प्रमुख महेंद्र (भैय्या) गंधे, प्रदेश सरचिटणीस विवेक नाईक, जिल्हा सरचिटणीस सचिन पारखी, जिल्हा सरचिटणीस महेश नामदे, प्रशांत मुथा, जिल्हा सरचिटणीस सविता कोटा, शिवसेनेचे युवा शहर प्रमुख पै. महेश लोंढे, युवा मोर्चाचे अध्यक्ष मयूर बोचुघोळ, ओबीसी मोर्चा सरचिटणीस अनिल निकम, मध्य मंडळ अध्यक्ष राहुल जामगावकर, युवा मोर्चा सरचिटणीस ओंकार लेंडकर, पुष्कर कुलकर्णी, गणेश शिंदे, राखी आहेर, कालिंदी, केसकर, महिला अध्यक्षा प्रिया जानवे, ज्योती दांडगे, नीता फाटक, सुनंदा नागुल, रोहिणी कोडम, रेखा गरुड आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे ॲड. आगरकर म्हणाले की, केंद्र व राज्यात संवेदनशील सरकार असून, नागरिकांना केंद्रबिंदू ठेवून काम केले जात आहे. शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच जिल्हा नियोजन मंडळ व खासदार विकास निधीतून दोन वर्षात सर्वाधिक निधी दिला गेला. मूलभूत सुविधा पुरवण्याचा अजेंडा घेऊन भाजप पक्ष कार्य करत आहे. यापुढे देखील समाजाशी बांधिलकी ठेवून नागरिकांच्या पाठीशी पक्षाचा प्रत्येक पदाधिकारी उभा राहणार असल्याचे त्यांनी आश्वासित केले.

बाबासाहेब वाकळे म्हणाले की, नागरी प्रश्नाला प्राधान्य देऊन, विकासात्मक कामे मार्गी लावण्यात आली. महापौर असताना दुजाभाव न करता सर्व प्रभागातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचे काम करुन मोठ्या प्रमाणात निधी आणल्याने विकास कामे मार्गी लागल्याचे त्यांनी सांगितले.
सविता कोटा यांनी नागरिकांचे विकास कामे मार्गी लागत असताना, काम करणाऱ्यांना नागरिकांनी साथ द्यावी. विकासाला चालना देवून प्रश्न सोडविणाऱ्यांच्या मागे नागरिकांनी उभे राहण्याचे सांगितले. महेश लोंढे यांनी पाठपुरावा करुन या भागातील अनेक प्रलंबीत कामे मार्गी लावण्यात आली. यापुढे देखील नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देवून ती सोडविली जाणार असल्याचे स्पष्ट केले. अनिल निकम यांनी कौशल्य भारत योजना विषयी नागरिकांना माहिती दिली. संदिप दातरंगे यांनी या कार्यक्रमासाठी विशेष योगदान दिले. याप्रसंगी गणेश शिंदे, महेश शिरसूळ, नाना देवतरसे, राजू तेल्ला, पोपट रासकर, अनिल राऊत, पोपट शेळके, गणेश चिलका, गणेश मंचिकटला, महेश रसाळ, सुनील वाघमारे, राजू वाळके, उमेश गोरे, सुनील वाघस्कर, राजकुमार शिंदे, ताराबाई शिंदे, जयश्री देवतरसे, शर्माताई, मयुरी गोरे, ज्योती रासकर, विजया भोईटे, सुवर्णा कोकणे, चौथे मावशी आदींसह गणेश नगर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थिती होते. गणेश नगर सोसायटीचे अध्यक्ष गणेश शिंदे सभा मंडपाच्या कामाची माहिती देवून आभार मानले.