सामाजिक कार्य व मिळालेल्या पुरस्काराबद्दल सत्कार
नगर (प्रतिनिधी)- दिल्ली येथील महात्मा ज्योतीबा फुले फेलोशिप नॅशनल अवॉर्ड मिळाल्याबद्दल व जिल्हा निवडणूक शाखेच्या वतीने मतदार जागृतीसाठी सन्मान झाल्याबद्दल पै. नाना डोंगरे यांचा जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीत विशेष सन्मान करण्यात आला.
सोसायटीच्या वतीने संस्थेच्या सेवानिवृत्त सभासदांचा कृतज्ञता सोहळा आणि सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. यावेळी संस्थेचे चेअरमन कैलास राहणे यांनी डोंगरे यांचा विशेष सन्मान केला. याप्रसंगी स्वामी विवेकानंद ग्रामीण संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब रोहकले, प्राचार्य सलाम शेख, भाऊसाहेब साबळे, राजेंद्र लांडे, सोपान कदम, प्राचार्य ज्ञानदेव बेरड, भाऊसाहेब काकडे, संस्थेचे चेअरमन कैलास रहाणे, व्हाईस चेअरमन अनिल गायकर, तज्ञ संचालक भाऊसाहेब कचरे, संचालक बाबासाहेब बोडखे, आप्पासाहेब शिंदे, महेंद्र हिंगे, कल्याण ठोंबरे, संस्थेचे सचिव स्वप्नील इथापे, आशा कराळे, मनीषा म्हस्के, नीलकंठ वाघमारे, बाबुराव जाधव आदी उपस्थित होते.
संस्थेचे चेअरमन कैलास रहाणे यांनी नाना डोंगरे विविध सामाजिक कार्यातून आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवीत आहे. यासाठी गेल्या 25 वर्षापासून संस्थेच्या वतीने त्यांचा दरवर्षी सन्मान केला जात आहे. त्यांचे सामाजिक कार्य दिशादर्शक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. उपस्थित संचालकांनी डोंगरे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.