सर्व पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे राज्य उपाध्यक्ष भालेराव यांचे आवाहन
विधानसभेसह आगामी सर्व निवडणुका व जिल्हा कार्यकारिणी पुनर्रचनेसंदर्भात होणार चर्चा
अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची आगामी विधानसभा व इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि दक्षिण जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना करण्यासंदर्भात सोमवारी (दि.19 ऑगस्ट) शहरातील शासकीय विश्रामगृह येथे महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीसाठी दक्षिणेतील रिपाईच्या सर्व पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव यांनी केले आहे.
रिपाईचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकचौरे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 1 वाजता या बैठकीला प्रारंभ होणार आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकांचा आढावा, विधानसभा, महानगरपालिका, नगरपालिका आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत पक्षातील उमेदवारी संदर्भात, जिल्हा कार्यकारणीची पुनर्रचना, सदस्य नोंदणी मोहीम राबविणे व पक्षाचे प्रमुख तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नियोजित दौऱ्यासंबंधी चर्चा व नियोजन करण्यात येणार आहे.
या बैठकीला जिल्हा कार्यकारिणी, महिला आघाडी, युवक आघाडी, तालुकाध्यक्ष व प्रमुख पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.