• Thu. Oct 16th, 2025

जिल्हाधिकारीपदी बढती झालेले गोरक्षनाथ गाडीलकर यांनी घेतले श्री विशाल गणेशाचे दर्शन

ByMirror

Aug 29, 2023

श्री विशाल गणेश मंदिर ट्रस्ट व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गाडीलकर यांचा सत्कार

गरिबीचे चटके सोसून गाडीलकर यांनी जिल्हाधिकारी पर्यंतचे गाठलेले ध्येय सर्वांना प्रेरणादायी -प्रा. माणिक विधाते

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथे उपजिल्हाधिकारी राहिलेले व नुकतीच जिल्हाधिकारीपदी बढती मिळालेले पळवे (ता. पारनेर) गावचे भूमिपुत्र गोरक्षनाथ गाडीलकर यांनी शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिराला भेट दिली. एक मंडप कर्मचारी ते जिल्हाधिकारी पर्यंतचा संघर्षमय प्रवास गाठणारे गाडीलकर विशाल गणेश चरणी नतमस्तक झाले.


श्री विशाल गणेश मंदिर ट्रस्ट व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गाडीलकर यांचा मंदिराचे पूजारी संगमनाथ महाराज व राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष तथा मंदिराचे विश्‍वस्त प्रा. माणिक विधाते यांनी सत्कार केला. यावेळी मंदिराचे उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, पारनेर मार्केट कमिटीचे संचालक प्रशांत गायकवाड, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अमित खामकर, केडगाव अध्यक्ष भरत गारुडकर, स्नेहबंध फाऊंडेशनचे उध्दव शिंदे, माजी नगरसेवक विष्णूपंत म्हस्के, किंगर आदी उपस्थित होते.


प्रा. माणिक विधाते म्हणाले की, गरिबीचे चटके सोसून गाडीलकर यांनी जिल्हाधिकारी पर्यंतचे गाठलेले ध्येय सर्वांना प्रेरणादायी आहे. अहमदनगरमध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून कार्य करताना त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला होता. त्यानंतर नाशिकला उपविभागीय महसुल उपायुक्त म्हणून त्यांनी उत्तमपणे कामकाज केले. तर त्यांना जिल्हाधिकारीपदी मिळालेली बढती सर्व नगरकरांच्या दृष्टीने भूषणावह असल्याचे त्यांनी सांगितले.


सत्काराला उत्तर देताना गाडीलकर यांनी प्रामाणिक व निष्ठेने केलेल्या कामाचे फळ मिळाले. सत्कर्माने केलेले कार्य व श्री विशाल गणेशाच्या आशिर्वादाने समाजातील दुर्लक्षीत घटकांची सेवा करण्याची संधी मिळाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *