हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने महिला दिन साजरा
महिलांच्या योगदानाने आरोग्य व पर्यावरण चळवळीला गती मिळाली -संजय सपकाळ
अहमदनगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या आरोग्य व पर्यावरण चळवळीत सक्रीय असलेल्या महिला सदस्यांचा महिला दिनानिमित्त सन्मान करण्यात आला. भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क येथे झालेल्या कार्यक्रमात महाशिवरात्रीचे औचित्य साधून महिलांच्या हस्ते बेलाचे व वडाचे झाड लावण्यात आले.

ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ यांनी महिलांचा सत्कार केला. यावेळी राजश्री राहिंज, पार्वती रासकर, प्रांजली सपकाळ, शोभाताई मुंढे, सुरेखा तोरडमल, उषाताई ठोकळ, यशोदा झावरे, संगीता दरवडे, वंदना मेहेत्रे, वर्षाताई खराडे, चंद्रकला येलुलकर, अर्चना सोनटक्के, आरती बोराडे, सुधाताई जावळे, अलका भिंगारदिवे, प्रीती भोकरिया, नमिता पांचारिया, रंजना झिंजे, राक्षी पांचारिया, निर्मला पांढरे, कविता भिंगारदिवे, मीनाताई रासणे, मालंदा हिंगणे, मनीषा शिंदे, वनिता दळे, पुष्पाताई शिंदे, मायरा दरवडे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
संजय सपकाळ म्हणाले की, मागील 24 वर्षापासून अविरतपणे ग्रुपचे सामाजिक कार्य सुरू आहे. आरोग्याप्रति जागरूक राहून दररोज सकाळी ग्रुपचे सदस्य योग प्राणायाम करतात. तर वृक्षरोपण व संवर्धनाच्या माध्यमातून पर्यावरणाचे रक्षण करण्याचे कार्य सुरु आहे. ग्रुपच्या या कार्यात महिला हातभार लावत आहे. हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सामाजिक चळवळीला महिलांच्या योगदानाने गती मिळाली आहे. सर्वच क्षेत्रात महिलांनी आघाडी घेतली असून, ग्रुपच्या महिला सदस्यांनी देखील उच्च पदावर जावून आपले कर्तृत्व सिद्ध केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महिलांनी देखील पहाटेच साजरा झालेल्या महिला दिन कार्यक्रमाचे आनंद द्विगुणीत झाला असून, आनखी सामाजिक कार्य करण्यास बळ मिळणार असल्याची भावना व्यक्त केली. याप्रसंगी मेजर दिलीपराव ठोकळ, सर्वेश सपकाळ, अनिल तोरडमल, विनायक कुलकर्णी, अभिजीत सपकाळ, मनोहर दरवडे, विकास भिंगारदिवे, सचिन चोपडा, दीपक अमृत, विठ्ठल राहिंज, दिलीप गुगळे, अविनाश जाधव, अशोक पराते, नामदेव जावळे, सुमेश केदारे, बापू तांबे, अशोक लोंढे, किशोर भिंगारकर, सुंदरराव पाटील, संतोष हजारे, मुन्ना वाघस्कर, सिताराम परदेशी, संजय वाकचौरे, रामनाथ गर्जे, कुमार धतुरे, संतोष लुणिया, जालिंदर बेल्हेकर, सुनील स्वामी, रमेश कटारिया, दिनेश शहापूरकर, शरद धाडगे, प्रशांत भिंगारदिवे, राजू शेख, रमेश धाडगे, सुधीर तेलंगे, ज्ञानेश्वर पवार, आकाश मेहेत्रे, शिवांग शिंदे आदी ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.
