बार आणि बेंचच्या सहकार्याने न्यायदान प्रक्रिया अधिक सक्षम -जिल्हा सत्र न्यायाधीश अंजू शेंडे
नगर (प्रतिनिधी)- न्यायधीश म्हणून काम करताना त्या शहरातील भौगोलिक परिस्थिती व परिसरातील वातावरणाशी एकरुप होवून काम करावे लागते. या शहरात रुजू झाल्यापासून कोणी परके असल्याचे जाणवले नाही. हे शहर ऐतिहासिक असून, अनेक गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. अनेक ऐतिहासिक घटनांशी जोडलेले हे शहर आहे. बार आणि बेंचच्या सहकार्याने पक्षकारांना न्याय मिळवून देण्याचे उकृष्टपणे काम होत असल्याचे प्रतिपादन जिल्हा सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी केले.
जिल्हा न्यायालयात कार्यरत असलेले न्यायधीश यांना बढती मिळाल्याबद्दल व बदली झाल्याबद्दल जिल्हा न्यायालय व अहमदनगर शहर बार असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी अध्यक्षीय भाषणात जिल्हा सत्र न्यायाधीश शेंडे बोलत होत्या. याप्रसंगी शहर वकील संघाचे अध्यक्ष ॲड. राजेश कातोरे, जिल्हा सरकारी वकील ॲड. सतीश पाटील, उपाध्यक्ष ॲड. वैभव आघाव आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
अध्यक्षीय सूचना वकील संघाचे सचिव ॲड. संदीप बुरके यांनी मांडली. त्याला अनुमोदन ॲड. विजय केदार यांनी दिले. प्रास्ताविकात ॲड. वैभव आघाव यांनी बार आणि बेंच सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने एकमेकांना सहकार्य करुन काम करत आहे. विविध जिल्ह्यात बदली झालेले न्यायाधीशांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी व न्यायदानाचे कार्य त्यांच्या हातून घडण्याची अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमात जिल्हा न्यायाधीश श्रीमती एस.व्ही. सहारे, अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एम.एस. तिवारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव भाग्यश्री पाटील, बी.एम. कार्लेकर साहेब, वाय एम. तिवारी मॅडम, जी.डी. निर्मळे मॅडम, एस.एस. पारवे, एम.ए. देशमुख मॅडम, आय.एम. नाईकवाडी, श्रीमती एस.जी. अग्रवाल, एच.आर. जाधव मॅडम, एम.पी. पांडे, बी.बी. शेळके, डी.एम. झाटे, टी.एम. निराळे, कामगार न्यायालयातील न्यायाधीश देशपांडे, देशमुख, व्ही.बी. शेट्टी, पी.डी. यवतकर मॅडम या न्यायधीशांचा फेटे बांधून सन्मान करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
बारा असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. राजेश कातोरे म्हणाले की, जिल्हा न्यायालयाला 200 वर्षाचा इतिहास आहे. न्यायदान करुन लोकशाहीचा पाया मजबूत करण्याचे काम न्यायालयाच्या माध्यमातून सुरु आहे. बार आणि बेंचमध्ये सामंजस्याची भूमिका असलेले अहमदनगर बार हा सर्वोत्तम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
न्यायाधीश भाग्यश्री पाटील यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणासाठी वकील मंडळींचे विशेष सहकार्य मिळाले. खांद्याला खांदा लावून काम करण्याबरोबर दुःखात अश्रू पुसण्यासाठी देखील वकील मंडळी धावून आले. आत्मीयतेने माणसे कमविल्याचा आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विविध न्यायधीशांनी मनोगत व्यक्त करुन वकील वर्गाशी स्नेहभाव जोडला गेला असून, काम करताना वकील मंडळींचे नेहमी सहकार्य मिळाले, कोणत्याही अडचणी आल्या नसल्याचे स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. ज्योती हिमणे यांनी केले. आभार ॲड. अभिजीत देशमुख यांनी मानले. या कार्यक्रमासाठी विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड, ॲड. अनिता दिघे, ॲड. अनुराधा येवले, ॲड. लक्षमण कचरे, ॲड. रमेश कराळे, ॲड. संजय पाटील, ॲड. अजिंक्य काळे, ॲड. आनंद सुर्यवंशी, ॲड. सुजाता बोडखे, ॲड. प्रतिक्षा मंगलाराम, ॲड. स्वाती पाटील, ॲड. धनंजय वाघ, ॲड. अजित वाडेकर, ॲड. वृषाली तांदळे, ॲड. करुणा शिंदे, ॲड.रामेश्वर कराळे, ॲड. राजेश कावरे, ॲड. प्रिया खरात, ॲड. शशिकांत पाठक, ॲड. सुवर्णा ढापसे, ॲड. मुबीना जहागीरदार, ॲड. संदीप शेंदुरकर, ॲड. महेश काळे, ॲड. दिपाली झांबरे, ॲड. गौरव दांगट, ॲड. नितीन डुबे, ॲड.अजय इनामदार आदींसह वकील संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.