• Wed. Nov 5th, 2025

विविध क्षेत्रात यश प्राप्त करणाऱ्या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांचा गौरव

ByMirror

Oct 24, 2023

भगवान गौतमबुध्द जॉगींग पार्कमध्ये सदस्यांचे श्रमदान

निरोगी जीवनातच जीवनाचा खरा आनंद -संजय सपकाळ

अहमदनगर (प्रतिनिधी)- ज्याचे स्वास्थ्य चांगले, तो सर्वसंपन्न व्यक्ती होय. निरोगी जीवनातच जीवनाचा खरा आनंद असून, हरदिन मॉर्निंग ग्रुप निरोगी आरोग्याची चळवळ चालवून पर्यावरण संवर्धनासाठी योगदान देत आहे. तर ग्रुप हा परिवार बनला असून, यश प्राप्त करणाऱ्या परिवारातील सदस्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा गौरव करण्यात आला असल्याचे प्रतिपादन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ यांनी केले.


हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने विविध क्षेत्रात यश प्राप्त करणारे ग्रुपचे सदस्य व त्यांच्या पाल्यांचा गौरव करण्यात आला. तर भिंगारच्या भगवान गौतमबुध्द जॉगींग पार्कमध्ये ग्रुपच्या सदस्यांनी श्रमदान केले. यावेळी सपकाळ बोलत होते. ग्रुपचे सदस्य असलेले अनिल तोरडमल यांची नायब तहसीलदारपदी नियुक्ती झाल्याबद्दल, जालिंदर बोरुडे यांना नागपूरचा नेत्रसेवक पुरस्कार जाहीर झाल्याने व वर्षभर निशुल्क योगाचे धडे येणारे प्रकाश देवळालीकर आणि ओम संतोष मिसाळ या विद्यार्थ्याची गोळाफेकमध्ये राष्ट्रीय स्पर्धेत निवड झाल्याबद्दल त्यांचा ग्रुपच्या वतीने सत्कार झाला.


या कार्यक्रमासाठी रमेश वराडे, मेजर दिलीप ठोकळ, सर्वेश सपकाळ, दीपक बडदे, विकास भिंगारदिवे, दिलीप गुगळे, दीपक धाडगे, मनोहर दरवडे, विठ्ठल राहिंज, सरदारसिंग परदेशी, अशोक लोंढे, सुमेश केदारे, विलासराव तोतरे, एकनाथ जगताप, सुभाष पेंढूरकर, अविनाश काळे, रामनाथ गर्जे, सिताराम परदेशी, किशोर भगवाने, संतोष हजारे, संतोष लुनिया, संतोष मिसाळ, विद्याताई मिसाळ, अनुजा मिसाळ, सार्थक साठे, सचिन थोरात, अशोक भगवाने, महेश सरोदे, विकास निमसे, संजय नायडू, जालिंदर आळकुटे, नवनाथ वेताळ, राजू शेख, जालिंदर बेरड, विलास मिसाळ, संपतराव ओहोळ, विशाल भामरे, रमेश लोंढे, सुनील बग्गन, योगेश चौधरी, सुनील थोरात, अशोक पराते, अनंत सदनापूर, दीपक टाक, विशाल भामरे, कुमार धतुरे, सूर्यकांत कटोरे, बाबासाहेब बेरड आदींसह ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


जालिंदर बोरुडे म्हणाले की, हरदिन मॉर्निंग ग्रुपने भिंगारमध्ये निरोगी आरोग्याचा पाया रचला. मागील 23 वर्षापासून हे कार्य सतत अविरतपणे सुरू असून, पर्यावरणासाठी वृक्षारोपण व संवर्धनाचे कार्य देखील सुरु आहे. ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक कार्याला प्रोत्साहन मिळत असून, प्रत्येक सदस्यांचा वाढदिवसही वृक्षरोपण व सामाजिक उपक्रमाने साजरा होत असल्याचे त्यांनी सांगितले. नायब तहसीलदार अनिल तोरडमल यांनी ग्रुप हे एक कुटुंब असून, अशा ग्रुपच्या माध्यमातून कुटुंब एकमेकांना जोडले जात आहे. कुटुंबात झालेला सत्कार आनखी चांगले कार्य करण्यास बळ देणार असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रुपच्या सदस्यांनी श्रमदानातून उद्यानात अस्थाव्यस्थ पडलेले साहित्य व पेव्हिंग ब्लॉक उचलून एका बाजूला ठेवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *