हरदिन मॉर्निंग ग्रुपचा शिक्षक दिनाचा उपक्रम
पर्यावरण संवर्धनाची चळवळ शिक्षकांमुळे यशस्वी होणार -संजय सपकाळ
अहमदनगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने शिक्षक दिन साजरा करण्यात आला. विद्यादानासह पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावणाऱ्या शिक्षकांचा ग्रुपच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
भिंगार येथील भगवान गौतम बुध्द जॉगिंग पार्कमध्ये झालेल्या कार्यक्रमात सुभाष होडगे (सारडा प्राथमिक शाळा), विजय महाजन (सेक्रेटहार्ड कॉन्व्हेंट), किसन मेहेर (जिल्हा परिषद शाळा), सुरेखा आमले-शिवगुंडे (छावणी परिषद स्कूल) सचिन काळे (सायन्स व मॅथ्स अकॅडमी) एकनाथ जगताप (रयत शिक्षण संस्था), कैलासराव बोनेकर (सॅलीवशन आर्मी स्कूल) या शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी हरदिनचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, रमेश वराडे, सुमेश केदारे, संजय भिंगारदिवे, दिलीप ठोकळ, मनोहर दरवडे, सर्वेश सपकाळ, दिनेश शहापूरकर, दिलीप गुगळे, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज अनावडे, सुधीर कपाले, राजू कांबळे, विश्वास (मुन्ना) वाघस्कर, विठ्ठल राहिंज, अभिजीत सपकाळ, रमेश त्रिमुखे, विकास भिंगारदिवे, प्रकाश देवळालीकर, सुभाष पेंढुरकर, सरदारसिंग परदेशी, अविनाश पोतदार, अनिल सोळसे, सिताराम परदेशी, रामनाथ गर्जे, कुमार धतुरे, योगेश चौधरी, सुनील कसबे, संजय नायडू, संतोष लुनिया, श्रीरंग देवकुळे, रमेश कोठारी, संजय बकरे आदींसह हरदिनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संजय सपकाळ म्हणाले की, शिक्षक हा भावी पिढीमध्ये संस्कार व सामाजिक मुल्य जिवंत ठेवणारा प्रवाह आहे. चार भिंतीच्या आत पुस्तकी ज्ञान देण्याबरोबरच जगात भरारी घेण्यासाठी पंखात ज्ञानरुपी बळ देण्याचे कामही शिक्षकच करत असतात. पर्यावरण संवर्धनाची चळवळ शिक्षकांमुळे यशस्वी होणार आहे. मुलांमध्ये जागृती निर्माण करुन उज्वल भवितव्याची नांदी शिक्षकांच्या योगदानाने शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सुभाष होडगे, किसन मेहेर व सचिन काळे यांनी सत्काराला उत्तर देताना हरदिन मॉर्निंग ग्रुपने केलेला सन्मानाने आनखी जबाबदारी वाढली आहे. कुटुंबातील सदस्यांनी केलेला सन्मान हा मोलाचा आहे. विद्यार्थ्यांना घडविण्याबरोबरच सामाजिक भान ठेऊन समाजाला दिशा देण्यासाठी कार्य केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
