अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शासनाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार मंदाताई डोंगरे यांना मिळाल्याबद्दल त्यांचा देखील सन्मान करण्यात आला.
आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात जिल्हा संपादन अधिकारी इंजि. मनोज ढोकचौळे यांच्या हस्ते डोंगरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थापक अध्यक्ष इंजि. विजयकुमार ठुबे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता इंजि. बाळासाहेब शेटे, कार्यकारी अभियंता सायली पाटील, उद्योजक एन.बी. धुमाळ, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश इथापे, राजेश परकाळे, ज्ञानदेव पांडुळे, संपूर्णा सावंत, माजी प्राचार्य खासेराव शितोळे, लक्ष्मणराव सोनाळे, राजश्री शितोळे, सतीश इंगळे आदी उपस्थित होते.
राजर्षी शाहू महाराज यांच्या 149 व्या जयंतीनिमित्त भिम पँथर संघटनेच्या वतीने श्रीरामपूर येथे झालेल्या कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल डोंगरे यांना समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनानिमित्त ग्रामपंचायतच्या वतीने मंदाताई डोंगरे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल डोंगरे दांम्पत्यांचे अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.