• Wed. Oct 15th, 2025

शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने जालिंदर बोरुडे यांचा सन्मान

ByMirror

Jul 25, 2024

नेत्रदान व अवयवदान चळवळीतील योगदानाबद्दल सत्कार

बोरुडे यांचे नेत्रदान व अवयवदानसाठी सुरु असलेली जनजागृती दिशादर्शक -आ. संग्राम जगताप

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- नेत्रदान व अवयवदान चळवळीत सक्रीयपणे योगदान देणारे फिनिक्स सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांचा शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने सन्मान करण्यात आला.


कोहिनूर मंगल कार्यालयात झालेल्या शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या 15 व्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या स्मरणिका प्रकाशन सोहळ्याप्रसंगी आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते बोरुडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजय कळमकर, जयंत येलुलकर, ज्ञानदेव पांडुळे, प्राचार्या माहेश्‍वरी गावीत, शब्दगंधचे सुनिल गोसावी, राजेंद्र उदागे, शर्मिला गोसावी, आकाशवाणीचे राजेंद्र दासरी आदी उपस्थित होते.


आमदार संग्राम जगताप यांनी फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून नेत्रदान व अवयवदानसाठी सुरु असलेली जनजागृतीचा उपक्रम दिशादर्शक आहे. फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बोरुडे यांच्या प्रयत्नाने अनेकांचे मरणोत्तर नेत्रदान यशस्वी झाले असून, अनेक अंधांना नवदृष्टी मिळाली असून, नेत्रदान व अवयवदान काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.


डॉ. संजय कळमकर यांनी भारतात अजूनही नेत्रदान व अवयवदानबद्दल गैरसमजूत असल्याने नागरिक अवयवदानासाठी पुढाकार घेत नाही. रोज मरणाऱ्या एका व्यक्तीचे डोळे दान केल्यास जवळपास सर्वच अंध व्यक्तींना दृष्टी प्राप्त होणार आहे. त्याचप्रमाणे अवयवदानाद्वारे अनेक गरजूंना नवजीवन जगता येणार असून, नेत्रदान व अवयवदान ही समाजाची असलेली गरज भागविण्याचे काम फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *