• Mon. Jul 13th, 2026

Mirrornews24

Marathi News

दहावीची गुणवंत विद्यार्थिनी ऐमन पठाण हिचा सन्मान

ByMirror

Jun 11, 2024
भिंगार जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने सत्कार

भिंगार जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने सत्कार

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने इयत्ता दहावी बोर्डातील गुणवंत विद्यार्थिनी ऐमन शाहिद पठाण हिचा सन्मान करण्यात आला.


भिंगार येथे झालेल्या दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात पठाण हिचा सत्कार झाला. ऐमन पठाण ही अशोकभाऊ फिरोदिया इंग्रजी मिडीयम स्कूलची विद्यार्थिनी असून, तिने दहावी बोर्डात 86 टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे.

ती संरक्षण खात्याचे सीक्युएव्ही अहमदनगरचे सेवानिवृत्त कर्मचारी अबुबकर पठाण व समाज कल्याण विभागाच्या सेवानिवृत्त अधिकारी शहेनाज पठाण यांची नात आहे. तिने मिळवलेल्या यशाबद्दल वडिल शाहिद पठाण, आई लुबना पठाण, जाहीद पठाण (काका), शिरीन पठाण (काकू) यांनी अभिनंदन केले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *