स्वस्थ नारी उपक्रमांतर्गत महिलांनी स्व आरोग्याकडे लक्ष द्यावे -आ. संग्राम जगताप
नऊ दिवस चालणार आरोग्याचा शिबिर; रक्तदान शिबिराचा समावेश
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- स्वस्थ नारी, सशक्त परिवार या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार देशभरात आरोग्य तपासणी औषधोपचार शिबिरे राबवली जात आहेत. महिलांनी स्व आरोग्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार घेतले पाहिजेत. माता सदृढ तर परिवारालाही सदृढ ठेवण्याचे कार्य महिला करतात. मोफत आरोग्य शिबिरे व शासनाच्या आरोग्य योजनांचा सर्व नगरकरांनी लाभ घेण्याचे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त केडगाव देवीला दर्शनासाठी येणाऱ्या महिला, बालक व भाविकांची आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. जिल्हा रुग्णालय, महापालिका आरोग्य विभाग, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, जिल्हा क्रीडा कार्यालय, मेरा युवा भारत, समग्र परिवर्तन युवा बहुउद्देशीय संस्था, जय युवा अकॅडमी, उमंग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वस्थ नारी, सशक्त परिवार उपक्रमातंर्गत केडगाव येथील एकता कॉलनी येथे नऊ दिवस मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
पुढे आमदार जगताप यांनी समग्र परिवर्तन युवा बहुउद्देशीय संस्था, जय युवा अकॅडमी या सामाजिक संस्था बाळासाहेब पाटोळे, ॲड. महेश शिंदे राबवित असलेल्या विविध सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.
प्रास्ताविकात बाळासाहेब पाटोळे म्हणाले की, गेल्या पंधरा वर्षापासून प्रभागातील व समाजातील समस्या सोडविण्याचे कार्य तसेच शासनाच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देशाने समग्र परिवर्तनाच्या माध्यमातून कार्य सुरू आहे. शारदीय नवरात्रोत्सवाच्या औचित्य साधून महिलांच्या आरोग्यासंदर्भात जागृती करण्याचे कार्य हाती घेण्यात आले आहे. केडगाव देवीच्या दर्शनासाठी येतात त्यांची आरोग्य तपासणी, औषधोपचार करून आरोग्य सेवा देण्याच्या उद्देशाने उपक्रम राबविण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पाहुण्यांना योगासनांची पुस्तके भेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. या आरोग्य शिबिरास मान्यवर म्हणून माजी नगरसेवक मनोज कोतकर, भाजपचे माजी शहराध्यक्ष महेंद्र गंधे, नितीन शेलार, सुजय मोहिते, संध्या पावसे, समिंद्रा पाटोळे, रावसाहेब काळे, विनोद साळवे, बाबू काकडे, उडानच्या अध्यक्षा आरती शिंदे, माहेर फाउंडेशनच्या रजनी ताठे, सूर्या मॉर्निंग ग्रुपचे राजकुमार चिंतामणी, वसंत डंबाळे, निलेश मेढे, जनकल्याणचे नितीन गोरडे, प्राचार्य संजय पडोळे, विनायक नेवसे, विनोद दुशिंग, सुनील सकट, माजी नगरसेविका आशाताई पवार, साहेबराव विधाते, भैय्यासाहेब कांबळे, रुपेश गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, मंगलताई पाटील, रेखाताई विधाते आदी उपस्थित होते.
जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना धिरडे, समुपदेशक बाळू इदे, मनपा आरोग्य विभागाच्या डॉ. काजल पवार, लॅब टेक्निशियन स्मिता आंधळे, सिस्टर मंदाकिनी दळवे, संपूर्ण सुरक्षा केंद्राच्या क्षेत्रीय अधिकारी वैशाली कुलकर्णी, कार्यक्रम व्यवस्थापक सागर फुलारी, डॉ. संतोष गिऱ्हे आदींनी महिला पुरुषांची तपासणी केली.
यावेळी ॲड. महेश शिंदे यांनी सध्याच्या पावसाळी वातावरणात साथीचे आजार, डासांपासून होणारे विविध आजार टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी रामेश्वर राऊत, मिया सय्यद, नितीन अनारसे, सुभाष काकडे, महेश पेंटा, अरुण ढाकणे, श्रीनिवास नागुल, श्रीधर शेलार, अनिकेत कदम, गणेश निकाळजे, अशोक धुमाळ, सोपानराव कारखिले, अशोक भोसले, पोपट भोसले, दिलीप जाधव, रमेश गाडगे आदींनी परिश्रम घेतले.
केडगाव देवीच्या सातव्या माळेनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन. दररोज होणार महिला व भाविकांची आरोग्य तपासणी. शिबिराच्या पहिल्याच दिवशी 250 महिलांची तपासणी.