रक्ताच्या विविध तपासण्या करुन निरोगी आरोग्यासाठी मार्गदर्शन
आजार होण्यापूर्वीच तपासणी गंभीर धोके टाळता येणार -डॉ. अनघा पारगावकर
नगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी मधील महिला कामगारांच्या निरोगी आरोग्यासाठी लायन्स क्लब ऑफ अहमदनगर, अबॉट कंपनी आणि अहमदनगर कम्युनिटी हेल्थ सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्ताच्या विविध तपासण्या करण्यात आल्या. महिला कामगारांमध्ये आरोग्याबद्दल जागृती करण्यात आली. तर प्लास्टिक मुक्तीचा संदेश देऊन महिला कामगारांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.

स्नाईडर इलेक्ट्रिक या कंपनीत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात कंपनीतील सर्व महिला कामगारांच्या रक्त तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये सीबीसी, हिमोग्लोबिन आणि इतर ब्लड सेल काऊंटची चाचणी करुन थायरॉईड स्क्रीनिंग करण्यात आली. या शिबिराप्रसंगी त्यावेळी लायन्स क्लबच्या अध्यक्षा डॉ. अनघा पारगावकर, डॉ. सिमरन वधवा, प्रणिता भंडारी, कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट अरविंद पारगावकर, संतोष माणकेश्वर, अभय मेस्त्री, ऋषी सुकाळे, प्रशांत मुनोत, डॉ. फिरोदिया, सौ.खांडरे, सतीश इंदानी, खांडरे, सुखटणकर आदी उपस्थित होते.
डॉ. अनघा पारगावकर म्हणाल्या की, कंपनीत काम करुन कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या महिलांनी आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. महिलांनी शारीरिक आरोग्य चांगले ठेवल्यास त्यांना कुटुंबाची जबाबदारी चांगली सांभाळता येणार आहे. चूकीची लाइफ स्टाईल, योग्य आहार आणि व्यायामाकडे दुर्लक्ष केल्याने गंभीर आजर उद्भवतात. आजार होण्यापूर्वीच त्याची तपासणी करुन उपचार केल्यास गंभीर धोके टाळता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. सिमरन वधवा यांनी महिला कामगारांसाठी आरोग्य शिबिर हे एक आरोग्याची पर्वणी ठरणार आहे. वेळोवेळी आरोग्य तपासणी केल्यास गंभीर आजारांना वेळीच टाळता येणार आहे. यामुळे आरोग्य चांगले राहून होणारा मोठा खर्च देखील वाचणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या शिबिरात महिलांना सदृढ व निरोगी आरोग्य ठेवण्यासाठी मार्गदर्शन करुन, त्यांच्या रक्ताच्या विविध तपासण्या करण्यात आल्या. शिबिरास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.