• Tue. Nov 4th, 2025

अरणगाव येथील हर्ष कांबळे याचे वैद्यकीय परिक्षेत (नीट) यश

ByMirror

Sep 26, 2024

मेहेर इंग्लिश स्कूलच्या वतीने सत्कार

अहमदनगर (प्रतिनिधी)- अवतार मेहेर बाबा ट्रस्ट संस्थेच्या मेहेराबाद अरणगाव येथील मेहेर इंग्लिश स्कूलचा माजी विद्यार्थी हर्ष संजय कांबळे याने वैद्यकीय परिक्षेत (नीट) यश प्राप्त केल्याबद्दल स्कूलच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापिका केतकी शेंदरे, व्यवस्थापिका मंजूला काला, अवतार मेहेर बाबा ट्रस्टचे विश्‍वस्त रमेश जंगले आदींसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.


मेहेर इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून समाजातील गरजू मुलांना मोफत शिक्षण दिले जात आहे. अरणगाव येथील शाळेचा माजी विद्यार्थी हर्ष संजय कांबळे याने वैद्यकीय परिक्षा (नीट) 2024 मध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. त्याची मुंबई येथील एच.बी. ठाकरे मेडिकल कॉलेज मध्ये एमबीबीएस शिक्षणासाठी निवड झाली आहे.


हर्ष याचे वडील संजय कांबळे अवतार मेहेर बाबा ट्रस्ट मध्ये अनेक वर्षापासून सेवा देत आहे. हर्ष याने बिकट परिस्थितीवर मात करुन चांगल्या गुणांनी यश संपादन केले आहे. त्याचा मेहेर बाबांचे पुस्तक व प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
मेहेर इंग्लिश स्कूल सक्षम पिढी घडविण्याचे कार्य करत आहे. दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाने या शाळेचे विद्यार्थी विविध क्षेत्रात चमकत असल्याची भावना रमेश जंगले यांनी करुन कांबळे याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या शाळेत शिकून मोठा झाल्याचा अभिमान आहे. शिक्षकांनी प्राथमिक शिक्षणाचा पाया मजबूत केल्याने हे यश गाठता आले. या यशात आई-वडिलांसह शिक्षकांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले.

सर्व सामान्य कुटुंबातील मुलगा असल्याची जाणीव होती, मात्र प्रामाणिकपणे कष्टाने अभ्यास करुन हे यश मिळवल्याचे त्याने स्पष्ट केले. तर इतर विद्यार्थ्यांना मोबाईल व सोशल मीडिया पासून लांब राहण्याचे आवाहन केले. यावेळी उपस्थित शिक्षकांनी त्याला शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *