• Mon. Jun 30th, 2025

हरदिन मॉर्निंग ग्रुपचा रौप्य महोत्सवी स्नेह मेळावा उत्साहात

ByMirror

Jun 30, 2025

अनामप्रेम व भीमा गौतमी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅगसह शैक्षणिक किटचे वाटप


तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान


जीवनात गमावलेले आरोग्य पुन्हा परत मिळत नाही -प्रल्हाद गीते

नगर (प्रतिनिधी)- सामाजिक क्षेत्रात योगदान देवून आरोग्य व पर्यावरण चळवळ चालविणाऱ्या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या रौप्य महोत्सवी वर्षाचा स्नेह मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात मागील 25 वर्षात ग्रुपच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेणाऱ्या हरदिनच्या रौप्य महोत्सवी स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. तर स्नेहालय संचलित अनामप्रेम व भीमा गौतमी विद्यार्थिनी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅगसह शैक्षणिक किटचे वाटप करुन गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.


नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या स्नेह मेळाव्याप्रसंगी सीए रवींद्र कटारिया, महेश पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन नंदकुमार (मन्नुशेठ) झंवर, संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, उद्योजक लॉरेन्स स्वामी, सीडी देशमुख लॉ कॉलेजचे सचिव नारायणराव साठे, रामभाऊ बिडवे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


प्रल्हाद गीते म्हणाले की, जीवनातील सर्व काही गमावलेले पुन्हा मिळवता येते. मात्र गमावलेले आरोग्य पुन्हा परत मिळत नाही. शरीर ही खरी धनसंपदा असून, ते जपण्यासाठी समाजात हरदिनच्या माध्यमातून सुरु असलेली जागृती प्रेरणादायी आहे. व्यायामाने निरोगी राहून आनंदी जीवन जगता येत असल्याचे त्यांनी सांगितले. तर नुकतेच निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमध्ये बुडणाऱ्या लोकांनी जीवाच्या आकांताने दिलेल्या हाकेला धावून त्यांचे प्राण वाचविले. हे पोलीस दलात कार्यरत असल्याने एकप्रकारे कर्तव्य पार पडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


प्रास्ताविकात संजय सपकाळ म्हणाले की, शरीराचे व पर्यावरणाच्या आरोग्यासाठी योग आणि वृक्षरोपण काळाची गरज बनली आहे. मागील पंचवीस वर्षापासून हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून आरोग्य चळवळ चालविण्यात येत आहे. ग्रुपचे पाचशेपेक्षा जास्त सदस्य असून, ते आरोग्य, पर्यावरण चळवळीबरोबरच सामाजिक कार्यात ग्रुपच्या माध्यमातून हातभार लावत असल्याचे त्यांनी सांगितले. सचिन चोपडा यांनी आरोग्य चळवळीबरोबर हरदिनचे सदस्य सामाजिक जबाबदारीने योगदान देत असून, गरजू घटकांना आधार देण्याचे कार्य सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


सीए रवींद्र कटारिया म्हणाले की, जीवनात कर्म महत्त्वाचे आहे. कर्मातून मनुष्याची ओळख निर्माण होते. ऋण फेडण्याच्या सामाजिक कार्यातून हरदिनचे कार्य सुरु असून, दररोज सुंदर व आनंदी पहाट ग्रुपच्या सदस्यांच्या माध्यमातून उगवते. ग्रुपच्या स्मरणिकेतून मागील 25 वर्षाचे कार्य समाजापुढे येणार आहे. शारीरिक व मानसिक श्रीमंती देण्याचे कार्य ग्रुपच्या माध्यमातून होत असल्याचे त्यांनी सांगितले.


उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते भिंगार हायस्कूल व मायादेवी ॲबट विद्यालयातील इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करुन शैक्षणिक किटचे वाटप करण्यात आले. उपस्थित सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त करुन मागील 25 वर्षातील ग्रुपच्या माध्यमातून आलेले अनुभव विशद केले.


या कार्यक्रमासाठी प्रांजली सपकाळ, वंदना मेहेत्रे, उषाताई ठोकळ, लताबाई सपकाळ, यशोदा झावरे, दिपाली सपकाळ, संगीता दरवडे, सुरेखा आमले, सुप्रिया सपकाळ, रजनी जाधव, शितल सपकाळ, विजय वाळुंजकर, मीरा मुळे, आशा पराते, राजश्री राहिंज, आदिती मेहेत्रे, कल्याणी धाडगे, आराध्या परदेशी, माया दरवडे, सुधा जावळे, रूपाली खुरपे, सुनीता खोत, सिद्धी खुरपे, ज्योती परदेशी, श्रुती खोत, ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष विठ्ठलराव लोखंडे, सुभाषराव होडगे, प्रमोद मुळे, सुनील कर्डिले, रावसाहेब झावरे, जहीर सय्यद, रमेश वराडे, दिलीप ठोकळ, ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज अनावडे, सर्वेश सपकाळ, जियान सय्यद, रतनशेठ मेहेत्रे, अभिजीत सपकाळ, दीपकराव धाडगे, सुधीर कपाळे, मनोहर दरवडे, अशोक पराते, अविनाश जाधव, सचिन पेंढुरकर, दीपक मेहतानी, कोंडीराम वागस्कर, अविनाश पोतदार, सुभाष पेंढुरकर, शेषराव पालवे, संजय भिंगारदिवे, ईवान सपकाळ, सलाबात खान, शैलेश शिंदे, इंद्रजीत बबलू, संजय काळभोर, सरदारसिंग परदेशी, सुनिल लालबोंद्रे, रवी लालबोंद्रे, राहुल आडकर, सुरेश कानडे, दिलीप गुगळे, दीपक बडदे, दशरथ मुंडे, नागेश खुरपे, कुमार धतुरे, शिवांश शिंदे, मुन्ना वाघस्कर, निजाम पठाण, शशिकांत पवार, विठ्ठल राहिंज, किरण सपकाळ, जयकुमार मुनोत, संतोष लुनिया, राजू कांबळे, अनिल सोळसे, सखाराम आळकुटे आदी उपस्थित होते.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपेश पसपुल व सचिन पेंढुरकर यांनी केले. आभार ज्ञानेश्‍वर महाराज अनावडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रकाश गांधी, संदीप शिंगवी, सागर काबरा, राजेंद्र चंगेडिया, जयराम मेहतानी, बजरंग दरक, राम बिडवे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सूर्यकांत कटोरे, किरण फुलारी, दीपक बोंदर्डे, सुहास ढुमणे, नारायण नायकू, रमेश खंडेलवाल, विनोद खोत, रामनाथ गर्जे, नामदेव जावळे, सिताराम परदेशी, पवन वाघमारे, अजय सपकाळ, आदित्य खुरपे, संतोष चोपडा, बाळासाहेब पाटील, दीपक घोडके, अशोक सपकाळ, प्रशांत चोपडा, प्रकाश देवळालीकर, सागर सपकाळ, विकास भिंगारदिवे, तुषार धाडगे, जालिंदर अळकुटे, नवनाथ वेताळ, प्रवीण सपकाळ, प्रज्योत सागु, सुमित चोपडा, निखील शिंदे, राजू शेख, राजकुमार मोरे, योगेश चौधरी, प्रशांत भिंगारदिवे, ओम सपकाळ, शंकरराव पंगुडवाले, दिनेश शहापूरकर, अजय खंडागळे, विकास भिंगारदिवे, रावसाहेब कोकणे, सचिन कस्तुरे, देविदास गंडाळ, नंदलाल परदेशी, दत्तात्रेय लाहुंडे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *