पहाटेच रंगला महिला दिनाचा सोहळा
महिलांच्या योगदानाने हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सामाजिक चळवळीला गती मिळाली -संजय सपकाळ
नगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने पर्यावरण चळवळीत सक्रीय असलेल्या महिला व छावणी परिषदेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालया मधील आरोग्य सेविका महिलांचा सन्मान करण्यात आला. महिला दिनानिमित्त भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क येथे ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज अनावडे यांच्या हस्ते महिलांचा सत्कार सोहळा पार पडला.
महिलांच्या सन्मान सोहळ्यात सुरेखाताई आमले, उषाताई ठोकळ, शाहीन शेख, प्रांजली सपकाळ, राजश्री मांढरे, स्वातीताई लकारे, निर्मलाताई पांढरे, चंद्रकलाताई रासने आदींसह आरोग्य सेविका व इतर महिलांचा देखील सत्कार करण्यात आला.
या सत्कार सोहळ्याप्रसंगी सुधीर कपाळे, रमेश वराडे, जहीर सय्यद, सचिन चोपडा, दीपकराव धाडगे, राजू कांबळे, मेजर दिलीप ठोकळ, सर्वेश सपकाळ, शिरीष पोटे, किरण फुलारी, वसंत राठोड, प्रभाकर देवळालीकर, अविनाश जाधव, सुभाष पेंढुरकर, प्रशांत चोपडा, मेजर गणेश लकारे, अनिल सोळसे, अभिजीत सपकाळ, अशोकराव दळवी, शेषराव पालवे, सुंदरराव पाटील, विनायक कुलकर्णी, योगेश चौधरी, तुषार घाडगे, सुनील कजबे, संदीप पाटील, सुहास देवराईकर आदी ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संजय सपकाळ म्हणाले की, मागील 25 वर्षापासून अविरतपणे ग्रुपचे सामाजिक कार्य सुरू आहे. आरोग्याप्रति जागरूक राहून दररोज सकाळी ग्रुपचे सदस्य योग प्राणायाम करतात. तर वृक्षरोपण व संवर्धनाच्या माध्यमातून पर्यावरणाचे रक्षण करण्याचे कार्य सुरु आहे. ग्रुपच्या या कार्यात महिला हातभार लावत आहे. हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सामाजिक चळवळीला महिलांच्या योगदानाने गती मिळाली आहे. तसेच आरोग्य सेविका वर्षभर नागरिकांच्या निरोगी आरोग्यासाठी कार्य करत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. महिलांनी देखील पहाटेच साजरा झालेल्या महिला दिन कार्यक्रमाचे आनंद द्विगुणीत झाला असून, आनखी सामाजिक कार्य करण्यास बळ मिळणार असल्याची भावना व्यक्त केली.